मुंबई: शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताचा सलामीवीर मुरली विजयची माफी मागितली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजलाही उपरती झाली आहे.

विराट कोहलीच्या दुखापतीवरुन नको ते अंदाज लावून, उतावीळपणे प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी हॉजने माफी मागितली आहे.

विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. मात्र कोहलीने आयपीएलसाठी कसोटीतून माघार घेतली, असा अजब दावा ब्रॅड हॉजने केला होता.  त्याप्रकरणी हॉजने माफी मागितली आहे.

माफीनाम्यात ब्रॅड हॉज काय म्हणाला? 

देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरणं हा कोणत्याही खेळाडूचा सन्मान असतो. मात्र मी केलेल्या वक्तव्यामुळे, मी तमाम भारतीयांची, क्रिकेटप्रेमींची आणि विशेषत: विराट कोहलीची माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा, टीका करण्याचा किंवा कुणाची मानहानी करण्याचा माझा हेतू नव्हता. हलक्या विनोदाच्या उद्देशाने मी तसं म्हणालो होतो.   

विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला


मला आयपीएलबद्दल आदर आहे. मी स्वत: या मोठ्या स्पर्धेत खेळलो आहे.

माझ्या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांची मनं दुखावली आहेत. त्यांना तसं वाटणं साहजिक आहे. मात्र मला कळून चुकलं आहे.

ज्या देशाने विराट कोहलीसारखं नेतृत्त्व दिलं, ज्या देशाने मला आनंद आणि सन्मान दिला, त्या भारतीयांची मी पुन्हा एकदा माफी मागतो. एक क्रिकेटपटू म्हणून मी सर्वांचा आदर करतो.

https://twitter.com/bradhodge007/status/847179312952352768

ऑस्ट्रेलियन मीडियाचा विराटवर निशाणा

ऑस्ट्रेलियन मीडियाकडून सतत विराटला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटची तुलना नुकतीच ‘क्रीडा जगतातील ट्रम्प’ अशी केली होती. त्यानंतर विराटच्या समर्थनार्थ बिग बी अमिताभ बच्चन आणि सुनील गावसकरही मैदानात उतरले होते.

ऑस्ट्रेलियन मीडिया हा ऑस्ट्रेलिया संघाचा सपोर्टिंग स्टाफ आहे, असं सुनील गावसकर म्हणाले होते.

बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ऑस्ट्रेलियन मीडियाला प्रत्युत्तर दिलं होतं. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटला खेळातील ट्रम्प म्हटलं आहे. त्याबद्दल आभार, विराट विजेता आहे आणि राष्ट्रपतीही, हे ऑस्ट्रेलियाने स्वीकारलं आहे, असं खणखणीत उत्तर बिग बींनी दिलं होतं.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांचाही विराटला टोमणा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला होता. कोहलीला सॉरी म्हणता येत नाही, एवढचं नव्हे तर त्याला सॉरीची स्पेलिंगही माहित नसेल, असं वक्तव्य सदरलँड यांनी एका रेडिओ स्टेशनशी बोलताना केलं.

धर्मशाळा इथे होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हात धुवून मागे लागल्याचं चित्र आहे. यामध्ये आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनीही उडी घेतली आहे.

बंगळुरु कसोटीत विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर डीआरएसप्रकरणी जाहीर टीका केली होती. त्यानंतर विराटने स्मिथची माफी मागावी, अशी मागणी सदरलँड यांनी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी या मुद्द्यावरुन विराटवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराटने विश्रांती घेतली : ब्रॅड हॉज


मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा


मुरली विजयला शिवी देताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद


सामना हरल्यानंतर डिनरला ये, जाडेजाचं मॅथ्यू वेडला निमंत्रण


विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला


आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराटने विश्रांती घेतली : ब्रॅड हॉज


विराटला ‘सॉरी’ची स्पेलिंगही येत नसेल : जेम्स सदरलँड