या कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, '2014 पूर्वी योग हे सांप्रदायिक असल्याचं मानलं जात होतं. पण आता जगभरातील लोकांना याचं महत्व पटलं आहे.' आदित्यनाथ यांनी योगातील सर्वात महत्वाच्या सूर्य नमस्काराची तुलना नमाजशी केली. 'सूर्य नमस्कार काही प्रमाणात नमाजशी मिळतंजुळतं आहे. त्यामुळे याला सांप्रदायिक नजरेनं पाहू नका.'
'योग ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा फायदा होऊ शकतो.' असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्या कार्याचंही कौतुक केलं.