Poland vs Mexico Match: फिफा वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी पोलंड आणि मेक्सिको यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर 7 मिनिटांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला, मात्र या अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला. पोलंड आणि मेक्सिकोचे संघ 'ग्रुप सी'मध्ये आहेत. याच ग्रुपमधील आणखी एक सामना काल पार पडला. अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया हा सामना पार पडला. सौदि अरेबियानं बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 अशा फरकानं पराभव केला. 


लेवनडॉस्कीनं संधी हुकवली


पोलंडचा स्टार फुटबॉलर लेवनडॉस्कीनं पेनल्टी गोल चुकवला आणि सामन्यात पोलंडवर दबाव वाढतच गेला. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा पोलंडचा कर्णधार आणि जगातील स्टार स्ट्रायकर रॉबर्ट लेवनडॉस्कीवर खिळल्या होत्या, मात्र लेवनडॉस्की गोल करण्यात अपयशी ठरला. रॉबर्ट लेवनडॉस्कीने पोलंडसाठी आतापर्यंत तब्बल 76 गोल केले आहेत. मात्र या महत्त्वाच्या सामन्यात त्यानं हातातली संधी गमावली. पेनल्टी मिळवत रॉबर्ट लेवनडॉस्कीनं गोल डागण्याचा प्रयत्न केला आणि मेक्सिकोचा गोलरक्षक ओचोआनं तो अडवला. 


सौदी अरेबियानं बलाढ्य अर्जेंटिनाला चारली धूळ 


यापूर्वी फिफा विश्वचषक 2022 च्या तिसऱ्या दिवशी ग्रुप-सीमधील सौदी अरेबिया विरुद्ध अर्जेंटिना सामना पार पडला. या सामन्याकडे सर्व फुटबॉलप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. फुटबॉलर लिओनल मेस्सी (Lionel MessI) कर्णधार असणाऱ्या तगड्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियाकडून (ARG vs KSA) 2-1 च्या फरकानं पराभूत व्हाव लागलं. विशेष म्हणजे, फिफा रँकिंगमधील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्जेंटिनाला 51 नंबरच्या सौदी अरेबियानं मात दिल्यामुळे फुटबॉल विश्वात खळबळ उडाली. खेळात काहीही होऊ शकतं, या वाक्याचा याच सामन्यात प्रत्यय आला. 


अर्जेंटिनाचा खराब डिफेन्स


सौदी अरेबिया विरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या पराभवाची अनेक कारण सांगण्यात येत आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अर्जेंटिनाचा खराब डिफेन्स. सामन्याच्या दहाव्या मिनिटालाच अर्जेंटिनानं पेनल्टीच्या मदतीनं गोल केला होता. मेस्सीच्या या गोलमुळं संघानं चांगली आघाडी घेतली. एका दमदार संघासाठी सामना जिंकण्यासाठी 1-0 ही आघाडी चांगली होती. पण त्यांनी डिफेन्सवर लक्ष दिलं नाही आणि सौदी संघानं आक्रमण करण्यास सुरुवात केली. हाफ टाईमपर्यंत त्यांना गोल करता आला नाही. पण हाफ टाईमनंतर लगेचच 48 आणि 53 मिनिटाला सौदीच्या संघानं गोलं करत आघाडी घेतली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Fifa World Cup 2022, ARG vs KSA : तगड्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियानं 2-1 नं दिली मात, वाचा पराभवाची प्रमुख तीन कारणं