Netherlands vs Argentina FIFA 2022:  कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या (FIFA World Cup 2022) उपांत्यपूर्व फेरीतील (Netherlands vs Argentina quarter final match) रोमहर्षक सामन्यात अर्जेंटिनाने नेदरलँडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांची गोल बरोबरी झाल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे झाला. यामध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा 4-3 ने पराभव केला. उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियासोबत होणार आहे. क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा धक्कादायक पराभव केला.


या उपांत्यपूर्व सामन्यात, अर्जेटिंनाचे वर्चस्व दिसत होते. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात नेदरलँड्सने जोरदार प्रतिकार करत अर्जेंटिनाला चांगलेच झुंजवले. सामन्याच्या 83 व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या सर्जियो बर्गहाऊसने दिलेल्या पासवर बाउट बेघोर्स्टने हेडरने गोल पहिला गोल करत अर्जेंटिनाची आघाडी 2-1 अशी कमी केली. त्यानंतर 90 व्या मिनिटापर्यंत अर्जेटिंना 2-1 अशा आघाडीवर होते. इंज्युरी टाइममध्ये नेदरलँड्सकडून सामना वाचवण्यासाठीची धडपड सुरू होती. अखेरच्या मिनिटाला बेघोर्स्टने गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर एक्स्ट्रा टाइममध्येही सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे होणार हे स्पष्ट झाले. 






पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडसला पहिल्या दोन संधीत अपयश आले. लूक जाँग, वूट वेगहार्स्ट, टेन कूपमायनर्स हे गोल करण्यास यशस्वी ठरले. तर, स्टीव्हन बर्घेस, व्हर्जिल व्हॅन डेक यांनी अर्जेंटिनाच्या गोलपोस्टचा लक्ष्यभेद करण्यास अपयश आले. अर्जेंटिनाकडून लिओनल मेस्सी, लॉटारो मार्टिनेझ, गोन्झालो मॉन्टिएल यांनी गोल करण्यास अपयश आले. एन्झो फर्नांडिझ याला अपयश आले. पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सच्या पहिल्या दोन संधीमध्ये अपयश आले. तर, अर्जेटिंनाला चौथ्या संधीत गोल करण्यास अपयश आले. त्यामुळे अर्जेंटिनाच्या अखेरच्या पेनल्टी शूटआऊटवर सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, गोन्झालो मॉन्टिएलने गोल करत अर्जेंटिनाला उपांत्य फेरीत नेले. 


मेस्सीचा विक्रम (Lionel Messi Record)


विश्वचषक स्पर्धेत मेस्सीच्या नावावर आता 10 गोल आहेत. यासह मेस्सीने अर्जेंटिनाचाच माजी फुटबॉलपटू गॅब्रिएल बतिस्तुताची बरोबरी केली आहे. मेस्सी आणि गॅब्रिएल हे आता संयुक्तपणे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारे अर्जेटिंनाचे खेळाडू झाले आहेत.  मॅराडोनाचे वर्ल्ड कपमध्ये 8 गोल आहेत.