FIFA World Cup Interesting Facts: कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 स्पर्धेला सुरुवात होत आहे. फुटबॉल विश्वचषकातील ही 22वी आवृत्ती असेल. आतापर्यंत झालेल्या 21 फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलचा संघ सर्वाधिक वेळा चॅम्पियन ठरलाय. ब्राझीलनं सर्वाधिक पाच वेळा फुटबॉल विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय. त्यानंतर यादीत जर्मनी आणि इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी प्रत्येकी चार-चार वेळा ट्रॉफी जिंकलीय. याशिवाय. जर्मनीच्या नावावर आणखी एका खास विक्रमाची नोंद आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा संघ सर्वाधिक वेळा उपविजेता ठरलाय. दरम्यान, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील खास पराक्रमावर एक नजर टाकुयात.


फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील खास पराक्रम


1) सर्वाधिक वेळा उपविजेता: हा विक्रम जर्मनीच्या नावावर आहे. जर्मनीच्या संघ 1966, 1982, 1988 आणि 2002 मधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला होता.


2) फर्स्ट राउंड एग्जिट: दक्षिण कोरिया आणि स्कॉटलंड यांच्या नावावर सर्वाधिक वेळा (8) वेळा विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडण्याची नोंद आहे.


3) सर्वाधिक विश्वचषक खेळलेला संघ: ब्राझीलनं आतापर्यंत झालेल्या सर्व विश्वचषक स्पर्धेत भाग घेतलाय. कतारमध्ये होणारा विश्वचषक हा ब्राझीलच्या संघाचा 22वा विश्वचषक असेल.


4) दिर्घकाळ चॅम्पियन: इटालियन संघ 16 वर्षांपासून चॅम्पियन आहे. इटलीनं 1934 आणि 1938 मध्ये विश्वचषक जिंकला होता. यानंतर दुसऱ्या महायुद्धामुळं 1942 आणि 1946 मध्ये विश्वचषक होऊ शकला नाही. 1950 मध्ये फुटबॉल जगताला नवा चॅम्पियन मिळाला. म्हणजेच 1934 ते 1950 पर्यंत इटली चॅम्पियन होता.


5) विश्वचषक न जिंकता सर्वाधिक सामने: चॅम्पियन न होता सर्वाधिक विश्वचषक खेळण्याचा विक्रम मेक्सिकोच्या नावावर आहे. मेक्सिकोच्या संघानं आतापर्यंत 16 फुटबॉल विश्वचषक खेळले आहेत.


6) एका सामन्यात सर्वाधिक गोल: फुटबॉल विश्वचषकातील एका सामन्यात हंगेरीच्या संघानं सर्वाधिक गोल केले आहेत. 1982च्या विश्वचषकात हंगेरीनं एल साल्वाडोरचा 10-1 असा पराभव केलाय.


7) एखाद्या संघासोबत सर्वाधिक सामने: फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना आणि जर्मनी सर्वाधिक वेळा एकमेकांशी भिडले आहेत. दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत. तीन वेळा दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते.


8) सर्वात तरुण खेळाडू: नॉर्दन आयर्लंडच्या नॉर्मन व्हाईटसाइडनं वयाच्या 17 वर्षे 41 दिवशी फुटबॉल विश्वचषकात पदार्पण केलं होतं. 1982 च्या विश्वचषकाचा हा विक्रम आजतागायत मोडलेला नाही.


9) सर्वात जुना खेळाडू: हा विक्रम इजिप्तच्या इसम अल हैदरीच्या नावावर आहे. वर्ल्ड कप 2018 मध्ये त्यानं वयाच्या 45 वर्षे आणि 161 दिवशी इजिप्तसाठी विश्वचषक खेळला  होता.


10) सर्वात वेगवान गोल: 2002 च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्याच्या सुरूवातीच्या 11व्या सेकंदात तुर्कीच्या हकन सुकुरनं गोल केला होता. 


हे देखील वाचा-