FIFA World Cup Spain vs Costa Rica: कतारमध्ये (Qatar) आयोजित करण्यात येत असलेल्या फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये स्पेनच्या फुटबॉल संघानं धमाकेदार सुरुवात केली. स्पेनच्या (Spain) संघानं आपल्या पहिल्या सामन्यात कोस्टा रिकाचा (Costa Rica) 7-0 असा पराभव केला आहे. या विजयासह स्पेननं फिफा विश्वचषकात तीन गुणांची कमाई केली आहे. 


फिफाच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या स्पेननं कोस्टा रिकाला या सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. स्पेननं फर्स्ट हाफमध्येच तीन गोल डागले. स्पेनला मात्र एकही गोल डागता आला नाही. कोस्टा रिकाचा संघ फिफा जागतिक क्रमवारीत 31व्या क्रमांकावर आहे. 


स्पेनने फर्स्ट हाफमध्येच डागले तीन गोल 


सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पेनची पकड मजबूत असल्याचं दिसत होतं. सामन्यातील पहिला गोल स्पेनच्या डॅनी ओल्मोनं (Dani Olmo) अकराव्या मिनिटालाच केला होता. यानंतर एकविसाव्या मिनिटाला दुसरा गोल डागला. स्पॅनिश खेळाडू मार्को एसेंसिओनंही (Marco Asensio)  मिळवलं. त्यानंतर तिसरा गोलही स्पेनच्या फेरान टोरेसनं (Ferran Torres) 31व्या मिनिटाला डागला आणि संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. 


अशाप्रकारे स्पेनच्या संघानं पूर्वार्धात 3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सेकंड हाफमध्ये कोस्टा रिकाचा संघ काही खास कामगिरी करून दाखवेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. सेकंड हाफमध्येही स्पेननं आपला दबदबा कायम ठेवत चौथा गोलही डागला. 


दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला पुन्हा एकदा स्पेननं आपला दबदबा कायम ठेवला. फर्स्ट हाफप्रमाणेच दुसऱ्या हाफमध्येही स्पेननं कोस्टा रिका संघाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही आणि सामन्यावरील आपलं वर्चस्व कायम ठेवलं. दुसऱ्या हाफमध्ये 54व्या मिनिटालाच स्पेननं चौथा गोल केला. हा गोल फेरान टोरेसनं डागला होता. या सामन्यातील त्याचा हा सलग दुसरा गोल ठरला. 


सामना संपायला काही मिनिटं शिल्लक असताना स्पॅनिश संघानं आणखी तीन गोल डागले. सामन्याती पाचवा गोल स्पेनच्या गॅवीनं 74व्या मिनिटाला केला. सामन्याची निर्धारित वेळ संपणार होती. त्यावेळी 90व्या मिनिटाला कार्लोस सोलरनं सहावा गोल डागला. त्यानंतर 


सामना शेवटच्या फेरीत प्रवेश करणार होता, तेव्हा स्पॅनिश संघाने आणखी तीन गोल केले. सामन्यातील पाचवा गोल स्पेनच्या गॅवीने  (Gavi) 74व्या मिनिटाला केला. सामन्याची निर्धारित वेळ संपणार होती, तेव्हा 90व्या मिनिटाला कार्लोस सोलरनं (Carlos Soler) सहावा गोल केला. यानंतर, अतिरिक्त वेळ मिळाल्यावर, अल्वारो मोराटानं (Álvaro Morata) 90+2 व्या मिनिटाला संघासाठी सातवा गोल डागला. फिफा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात स्पेननं तब्बल 7 गोल डागत ऐतिहासिक विजय मिळवला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


FIFA WC 2022 Qatar : फिफामधील धक्कादायक निकालांचं सत्र कायम, जपानचा जर्मनीवर 2-1 ने रोमहर्षक विजय