Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) राऊंड ऑफ 16 सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे. आज दोन सामने खेळवले जाणार असून स्पेन आणि मोरोक्को (Spain vs Morocco)  या संघात रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सामना पार पडणार आहे. दोन्ही संघांसाठी उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी आज विजय मिळवणं अनिवार्य असणार आहे.

  

दोघांच्या हेड टू हेड रेकॉर्डचा विचार केला तर स्पेन आणि मोरोक्को हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण तीन वेळा आमने-सामने मैदानात उतरले आहेत. या सामन्यांमध्ये स्पेन संघाने आपला दबदबा कायम ठेवत तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. पण आजचा अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघ खेळण्यासाठी मैदानात उतरणार असून जिंकणारा संघ थेट क्वॉर्टर फायनलमध्ये एन्ट्री मिळवणार आहे. त्यामुळे एक चुरशीचा सामना होण्याची अपेक्षा आहे.   

कधी, कुठे पाहाल सामना?

स्पेन विरुद्ध मोरोक्को हा बाद फेरीचा सामना आज रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी पार पडणार आहे. कतार येथील एज्युकेशन सिटी स्टेडियम याठिकाणी हा सामना रंगणार आहे. भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

राऊंड ऑफ 16 च्या उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक:

सामना संघ तारीख वेळ ठिकाण
Round of 16: Match- 7 स्पेन विरुद्ध मोरोक्को 06 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता एज्युकेशन सिटी स्टेडियम
Round of 16: Match- 8 पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड 07 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता लुसेल स्टेडियम

हे देखील वाचा-