Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) तिसऱ्या स्थानासाठी क्रोएशिया आणि मोरोक्को (CRO vs MOR) यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 17 डिसेंबर रोजी खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत क्रोएशियाचा अर्जेंटिनाकडून 3-0 असा पराभव झाला होता. दुसऱ्या उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. ज्यामुळे या दोघांना फायनलचं तिकिट मिळालं नसलं तरी तिसरं स्थान पटकावण्याची संधी त्यांच्याकडे आहे. दरम्यान या विश्वचषकात क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात सामना होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीचा सामना ड्रॉ झाला होता.


विश्वचषकाच्या इतिहासातील तिसऱ्या स्थानासाठीच्या शेवटच्या 19 सामन्यांपैकी एकही सामना पेनल्टीपर्यंत गेलेला नाही. या दरम्यान, 1986 मध्ये फक्त एकदाच अतिरिक्त वेळेत फ्रान्स आणि बेल्जियम यांच्यात सामना झाला होता. फिफा विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी युरोपीय संघाने शेवटचे 10 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. क्रोएशियाचा संघ दुसऱ्यांदा विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी खेळणार आहे. यापूर्वी 1998 मध्ये त्यांनी नेदरलँड्सचा 2-1 असा पराभव केला होता.


दोघांच्या हेड टू हेड रेकॉर्डचा विचार करता आफ्रिकन संघांविरुद्ध फिफा विश्वचषकात क्रोएशियाचा रेकॉर्ड मजबूत आहे. याआधी विश्वचषकातील तीन सामन्यांत आफ्रिकेचा कोणताही संघ त्यांच्याविरुद्ध गोल करू शकला नव्हता. 2014 मध्ये क्रोएशियाने कॅमेरूनचा 4-0 आणि 2018 मध्ये नायजेरियाचा 2-0 असा पराभव केला. या वर्षी त्याने मोरोक्कोविरुद्धचा क्रोएशियाचा सामना अनिर्णीत ठरला. अशा स्थितीत क्रोएशियाला मोरोक्कोचं आव्हान आणखी अवघड असेल.


कधी, कुठे पाहाल सामना?


क्रोएशिया विरुद्ध मोरोक्को हा तिसऱ्या स्थानासाठीचा सामना भारतीय वेळेनुसार 17 डिसेंबर रोजी रात्री 08.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. दुसरीकडे अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात 18 डिसेंबरला फिफा विश्वचषकाचा फायनलचा सामना रंगणार आहे.




 


हे देखील वाचा-