Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) आजपासून राऊंड ऑफ 16 च्या सामन्यांना सुरुवात होत आहे. 32 देशांनी स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर आता बाद फेरीत 16 संघ आहेत. विशेष म्हणजे सर्व जगाचं लक्ष लागलेल्या लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा सामना आज मध्यरात्री ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट उपांत्य पूर्व फेरीत अर्थात क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचणार आहे. स्पर्धेत सौदी अरेबियाकडून पराभूत झाल्यानंतर अर्जेंटिना संघाने आधी मेक्सिको आणि मग पोलंडला मात देत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश मिळवला आहे. पण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजचा विजय अर्जेंटिनासाठी अनिवार्य आहे.
विशेष म्हणजे यंदा विश्वचषक विजयाच्या दावेदारांमध्ये अर्जेंटिना आघाडीवर आहे. लिओनेल मेस्सीचाही हा शेवटचा विश्वचषक असल्याने जगभरातील मेस्सीचे चाहते यावेळी अर्जेंटिनाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. सौदीविरुद्ध पराभवानंतर मात्र आता अर्जेंटिना उत्कृष्ट लयीत आहे. अशा स्थितीत अर्जेंटिना पुन्हा एकदा 1978 आणि 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करून विश्वचषक जिंकेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे, तर हा महत्त्वाचा सामना कधी, कुठे पाहता येईल हे जाणून घेऊ...
कधी, कुठे पाहाल सामना?
हा अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
नेदरलँड आणि युएसएही उतरणार मैदानात
अर्जेंटिना संघाच्या सामन्यापूर्वी राऊंड ऑफ 16 चा पहिला सामना नेदरलँड्स विरुद्ध यूएसए यांच्यात खेळवला जाणार आहे. नेदरलँडचा संघ ग्रुप ए मध्ये अव्वल, तर यूएस संघानं ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान पटकावलं. खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना 3 डिसेंबरला म्हणजेच आज रात्री 8.30 वाजता होणार आहे.
राऊंड ऑफ 16 चं संपूर्ण वेळापत्रक:
सामना | संघ | तारीख | वेळ | ठिकाण |
Round of 16: Match- 1 | नेदरलँड्स विरुद्ध यूएसए | 03 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता. | खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम |
Round of 16: Match- 2 | अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया | 04 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | अहमद बिन अली स्टेडियम |
Round of 16: Match- 3 | फ्रान्स विरुद्ध पोलंड | 04 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | अल थुमामा स्टेडियमवर |
Round of 16: Match- 4 | इंग्लंड विरुद्ध सेनेगल | 05 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | अल बेट स्टेडियम |
Round of 16: Match- 5 | जपान विरुद्ध क्रोएशिया | 05 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | अल जनुब स्टेडियम |
Round of 16: Match- 6 | ब्राझील विरुद्ध कोरिया | 06 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | स्टेडियम 974 |
Round of 16: Match- 7 | स्पेन विरुद्ध मोरोक्को | 06 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | एज्युकेशन सिटी स्टेडियम |
Round of 16: Match- 8 | पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड | 07 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | लुसेल स्टेडियम |
हे देखील वाचा-