Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) आजही एकूण तीन सामने खेळवले जाणार असून मध्यरात्री 12.30 वाजताही एक सामना खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वच सामन्यात अगदी तगडे संघ परिणामी दमदार खेळाडू मैदानात उतरणार आहेत. दिवसातील पहिला सामना गतवर्षीचे उपविजेते क्रोएशिया आणि मोरक्को यांच्यात रंगणार आहे. मागील वर्षी क्रोएशियाने कडवी झुंज दिली पण थोडक्यात ते जगज्जेते होण्यापासून हुकले यंदा मात्र ते नक्कीच चषक उंचावण्यासाठी सर्व प्रयत्न करतील. दिवसातील दुसरा सामना जागतिक फुटबॉलमधील दमदार संघ जर्मनी खेळणार आहे. समोर आशियाई संघ जपानचं आव्हान असणार आहे. जर्मनीचा संघ जपानच्या तुलनेत बराच ताकदवर असला तरी उलटफेरांचं सुरु सत्र पाहता सामना चुरशीचा होऊ शकतो. दिवसातील तिसरा सामना स्पेन आणि कोस्टारिका यांच्यात होणार आहे. स्पेन बऱ्याच युवा खेळाडूंसह आता मैदानात उतरत असून कोस्टारिका संघातही पट्टीचे खेळाडू आहेत. यानंतर मध्यरात्री 12.30 वाजता बेल्जियम आणि कॅनडा हे संघ मैदानात उतरणार असून क्लब फुटबॉलमधील स्टार खेळाडू बेल्जियम संघातून मैदानात उतरताना दिसतील. 


कोणाच पगडा भारी?


आज सामने होणाऱ्या संघाचा विचार करता फीफा रँकिंगमध्ये क्रोएशिया 12 व्या तर मोरक्को 22 व्या स्थानावर आहे.  दुसरीकडे जर्मनी विरुद्ध जपानमध्ये जर्मनी फीफा रँकिंगमध्ये 11 व्या तर जपान 24 व्या स्थानावर आहे. स्पेन आणि कोस्टारिकामध्ये स्पेन सात नंबरवर तर कोस्टारिका 31 नंबरवर आहे. अखेरचा मध्यरात्री 12.30 वाजताचा सामना होणारा बेल्जियमचा संघ नंबर दोनवर आहे तर कॅनडा 41 व्या नंबरवर आहे. 


कधी होणार सामने?


आज होणारा पहिला सामना मोरक्को विरुद्ध क्रोएशिया भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे. त्यानंतर 6.30 वाजता जर्मनी विरुद्ध जपान आणि 9.30 वाजता स्पेन विरुद्ध कोस्टारिका सामना होईल. त्यानंतर मध्यरात्री 12.30 मिनिटांनी बेल्जियम विरुद्ध कॅनडा सामना रंगणार आहे. 


कुठे पाहाल सामना?


भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.


हे देखील वाचा-