Fifa World Cup Final Argentina vs France : कतारमध्ये पार पडलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत  (FIFA World Cup 2022 Qatar) लिओनल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असणाऱ्या अर्जेंटिना संघाने (Team Argentina) विजय मिळवला. रोमहर्षक अशा फायनलच्या सामन्यामध्ये (Fifa World Cup 2022 Final) पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना संघाने फ्रान्सवर 4-2 (France vs Argentina) असा विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला. या भव्य विजयानंतर जगातील प्रत्येक कोपऱ्यातून अर्जेंटिना संघावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये जगातील अव्वल दर्जाचं सर्च इंजिन असणाऱ्या गूगलने (Google Search Engine) देखील एक खास डूडल (Google Doodle) तयार करत अर्जेंटिनाचा विजय सेलिब्रेट केला आहे.


या गूगल डूडलमध्ये डिस्को लाईटप्रमाणे गूगल (Googl) अगदी गोल्डन वर्ड्समध्ये दिसत असून त्याखाली बरेच गोल्डन फुटबॉल पडलेले दिसत आहेत. ज्यातून अर्जेंटिना संघाला रिप्रेंजेंट करणारा एक शूज ही या फुटबॉल्समधून बाहेर येताना दिसत आहे. सर्वत्र झगमग दिसत असून अर्जेंटिनाला अशाच झगमगत्या शुभेच्छा गूगलने या डूडलमधून दिल्या आहेत.


पाहा खास गूगल डूडल-






हायवोल्टेज फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी


फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप (Messi Won World Cup) जिंकला. ज्यामुळे अर्जेंटिना संघाने 1978 आणि 1986 नंतर तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला आहे.


हे देखील वाचा-