Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) आज फायनलचा महामुकाबला खेळवला जाणार आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना (France vs Argentina) या दिग्गंज संघामध्ये ही लढत रंगणाॉर आहे. दोन्ही संघानी संपूर्ण स्पर्धेत कमाल कामगिरी करत फायनल गाठली आहे. दोन्ही संघात क्लासिक खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो. दरम्यान या हायवोल्टेज सामन्याच्या निकालातून कोणता संघ फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) उंचावणार हे समोर येणार आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलचा विचार केल्यास एकीकडे मेस्सीच्या अर्जेंटिनाने क्रोएशियाचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले, तर दुसरीकडे फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट आपल्या नावे केले. दरम्यान आज फ्रान्स आणि अर्जेंटिना हे संघ जेतेपदाच्या लढतीसाठी एकमेकांशी भिडणार असून याआधी दोन्ही संघांनी 2-2 वेळा फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.
कधी, कुठे पाहाल सामना?
आजचा फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना हा महामुकाबला भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना Head to Head
अर्जेंटिना आणि फ्रान्स विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोनदा अर्जेंटिना आणि एकदा फ्रान्सच्या संघाने बाजी मारली आहे. गेल्या विश्वचषकात हे दोन्ही संघ राऊंड ऑफ 16 च्या फेरीत भिडले होते, ज्यात फ्रान्सने रोमहर्षक लढतीत अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला होता.
हे देखील वाचा-