Cameroon vs Serbia Match Report: यंदा कतारमध्ये फिफा विश्वचषकाच्या (FIFA 2022) महासंग्रामाचं आयोजन करण्यात आलं आहे. काल (सोमवारी) फिफा विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कॅमेरून (Cameroon) आणि सर्बियाचे (Serbia) संघ आमनेसामने होते. दोन्ही संघांमधील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. महत्त्वाचं म्हणजे, कॅमेरून आणि सर्बिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता वाढली आहे. कॅमेरून आणि सर्बिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिला, त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाले. अशा स्थितीत कॅमेरून आणि सर्बियानं आपला शेवटचा सामना जिंकला तरी पुढची फेरी गाठण्याची शक्यता फारच कमी आहे. 


दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत 


या सामन्यातील पहिला गोल कॅमेरून संघानं केला, मात्र पूर्वार्धाच्या अखेरीस दोन मिनिटांच्या कालावधीत दोन गोल करत सर्बियानं 2-1 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला सर्बियानं आणखी एक गोल करत सामन्यात 3-1 अशी आघाडी मिळवली. मात्र, कॅमेरूननं दमदार पुनरागमन केलं. कॅमेरूनच्या संघानं 64व्या आणि 66व्या मिनिटाला एकापाठोपाठ दोन गोल डागले. त्यानंतर दोन्ही संघांनी 3-3 अशी बरोबरी साधली. मात्र, त्यानंतर दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे कॅमेरून आणि सर्बिया यांच्यातील सामना 3-3 अशा बरोबरीत सुटला.


कॅमेरुनचा संघ : 


डेविस एपासी, कोलिन्स फाय, जीन-चार्ल्स कॅस्टेलेटो, निकोलस नकोलू, नूहो टोलो, आंद्रे-फ्रँक जाम्बो-एंगुइसा, पियरे कुंडे, मार्टिन होंगला, ब्रायन म्ब्यूमो, एरिक-मॅक्सिम चौपो-मोटिंग (कर्णधार), कार्ल टोको एकांबी 


सर्बियाचा संघ : 


वंजा मिलिंकोविक-सॅविक, निकोला मिलेंकोविक, मिलोस वेल्जकोविक, स्ट्रॅहिंजा पावलोविच, एंड्रीजा जिवकोविक, सर्गेज मिलिंकोविक-सेविक, सासा लुकिक, फिलिप कोस्टिक, नेमांजा मॅक्सिमोविच, दुसान टॅडिक (कर्णधार), अलेक्जेंडर मित्रोविक


कुठे पाहाल फिफाचे सामने?


भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.


फिफा वर्ल्ड कप 2022 चं फॉर्मेट


ग्रुप स्टेजमध्ये, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ राऊंड ऑफ 16 च्या फेरीत प्रवेश करतील. जिथून बाद फेरीचे सामने सुरू होतील. म्हणजेच विजयी संघ पुढे जातील आणि पराभूत संघ विश्वचषकातून बाहेर पडतील. राऊंड ऑफ 16 मध्ये आठ सामने होतील, ज्यामध्ये 16 पैकी आठ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून विजयी चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना 18 डिसेंबरला खेळवला जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Fifa World Cup 2022 : फुटबॉलचा महासंग्राम 2022; सामन्यांचं वेळापत्रक जाणून घेण्यासाठी एक क्लिक करा