नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी असलेल्या हॉटेलमध्ये आग लागली आहे. दिलासादायक बाब म्हणजे महेंद्रसिंह धोनीसह सर्व खेळाडू सुरक्षित आणि सुखरुप आहेत.

झारखंड आणि बंगाल संघामध्ये विजय हजारे ट्रॉफीचा उपांत्य सामना आज दिल्लीच्या पालममध्ये होणार होता. त्यासाठी झारखंडचा संघ दिल्लीत आला होता. द्वारका सेक्टर 10 मधील 'वेलकम' या हॉटेलमध्ये संघ थांबला होता, तिथे आग लागली.

परंतु आगीत खेळांडूंचं क्रिकेट किट जळाल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. आता हा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात खेळवला जाणार आहे.

ज्यावेळी आग लागली त्यावेळी कर्णधार धोनीसह झारखंडचा संपूर्ण संघ हॉटेलमध्ये उपस्थित होता. आग लागल्यानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.