मुंबई: ‘नीट’च्या परीक्षेसाठी केंद्रांमध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.


केंद्राच्या या निर्णयामुळं महाराष्ट्रातल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण नीटच्या परीक्षेसाठी राज्यात मर्यादीत केंद्राची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागणार होता. मात्र परीक्षा केंद्रांची सख्या वाढवल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय टळणार आहे.

महाराष्ट्रातून यावर्षी 2 लाख 74 हजार विद्यार्थी नीटची परिक्षा देणार आहेत. एवढ्या विद्यार्थ्यासाठी नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी सहाच केंद्र मंजूर करण्यात आली होती. परीक्षा 7 मे रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत होणार आहे.

दरम्यान, ‘नीट’साठी विभागातच परीक्षा केंद्र उपलब्ध होणार असल्यानं विद्यार्थ्यांना दूरवरचा प्रवास करावा लागणार नाही.

 

केंद्रीय पध्दतीनं यापूर्वी 2013 साली वैद्यकीय प्रवेश परिक्षा झाली होती. त्यात महाराष्ट्राचा उत्तीर्ण टक्का 6 टक्क्यांपर्यंत घसरला होता. दाक्षिणात्य राज्यांनी निकालात आघाडी घेतली होती. नीटची परीक्षा 11वी आणि 12वीच्या संयुक्त अभ्यासक्रमावर आधारित 180 प्रश्नांची होणार आहे.

संबंधित बातम्या:

चांदा ते बांदा, राज्यात नीटसाठी फक्त सहाच परीक्षा केंद्र!