Fifa World Cup 2022 Final : अर्जेंटिना संघाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीने अखेर आपल्या संघाला फिफा विश्वचषक (Fifa WC) जिंकवून दिला. फायनलमध्ये (Fifa World Cup 2022 Final) फ्रान्सवर रोमहर्षक विजय मिळवत अर्जेंटिना चॅम्पियन बनला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात मेस्सीनेच अप्रतिम कामगिरी केली. ज्यानंतर आता आपल्या संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर मेस्सीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.


या पोस्टमध्ये मेस्सीनं लिहिलं आहे की, 'मी विश्चचषक विजयाचं स्वप्न अनेक वेळा पाहिलं, मला ही गोष्ट इतकी मनापासून हवी होती की, मला अजूनही विश्वास होत नाही. मी माझ्या कुटुंबाचे, ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आम्ही पुन्हा एकदा दाखवून देतो की अर्जेंटिना जेव्हा आम्ही एकत्र लढतो आणि एकत्र येतो तेव्हा आम्ही जे करायचे ते साध्य करतोच. हे संपूर्ण टीमचे यश आहे जे कोणत्याही व्यक्तीपेक्षा वरचढ आहे. हीच आमची ताकद होती त्याच स्वप्नासाठी आम्ही लढलो, हेच स्वप्न अर्जेंटिनाचे होते. आम्ही ते पूर्ण करुन दाखवले'.  


मेस्सीची इन्स्टाग्राम पोस्ट-






अर्जेंटिनाचा रोमहर्षक विजय


फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला.  


हे देखील वाचा-