सोची : शनिवारी रशियाच्या सोची मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात जर्मनीने स्वीडनवर 2-1 ने मात केली आहे. अखेरच्या क्षणांत निर्णायक गोल डागणारा टोनी क्रूस जर्मनीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. टोनीच्या या निर्णायक गोलमूळेच फिफा विश्वचषकातील जर्मनीचे आव्हान जिवंत राहीले आहे.
सामन्यात ओला टॉयवोनन याने 32 व्या मिनिटाला स्वीडनचं खातं उघडून जर्मनीच्या संघाला धक्का दिला. ४८व्या मिनिटाला मार्को रूसनं गोल मारून जर्मनीला बरोबरी साधून दिली. त्यानंतर टोनी क्रूसनं एन्जुरी टाइममध्ये केलेल्या गोलनं जर्मनीला विजय मिळवून दिला. तर या विजयी गोलनं जर्मनीचे बाद फेरीतील आव्हान कायम राहीले आहे.
फ गटात जर्मनी आणि स्वीडनने ३-३ गुण प्राप्त केले आहेत. तर मेक्सिको ६ गुण मिळवत अग्रस्थानी आहे. फ गटातल्या सलामीच्या सामन्यात मेक्सिकोनं जर्मनीचा 1-0 असा पराभव केला होता. या पराभवानं जर्मनीसमोर विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात येण्याची भीती निर्माण केली होती.
FIFA World Cup 2018 : टोनी क्रूसचा निर्णायक गोल, जर्मनीची स्वीडनवर मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2018 08:29 AM (IST)
अखेरच्या क्षणांत निर्णायक गोल डागणारा टोनी क्रूस जर्मनीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. टोनीच्या या निर्णायक गोलमूळेच फिफा विश्वचषकातील जर्मनीचे आव्हान जिवंत राहीले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -