मॉस्को : मेक्सिकोनं दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव करून, विश्वचषकात आपला सलग दुसरा विजय साजरा केला. कार्लोस वेलानं सव्विसाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मेक्सिकोचं खातं उघडलं.


मग मेक्सिकोच्या झेवियर हर्नांडेझनं ६६व्या मिनिटाला दुसऱ्या गोलची नोंद केली. या गोलसह त्यानं आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतल्या गोल्सचं अर्धशतक साजरं केलं.

ह्यून्ग मिन सॉन्गनं एन्जुरी टाइममध्ये दक्षिण कोरियाचा एकमेव गोल झळकावला. त्यामुळं मेक्सिकोला २-१ अशा विजयावर समाधान मानायला लागलं.

मेक्सिकोनं गटातल्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या जर्मनीचा धक्कादायक पराभव केला होता. या दोन विजयांनी मेक्सिकोला बाद फेरीचं तिकीट मिळवून दिलं आहे.