FIFA World Cup 2018 : डेन्मार्कची पेरुवर मात
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2018 12:32 AM (IST)
डेन्मार्कचा हा सलग सोळावा विजय ठरला. युसूफ पोल्सननं ५९ व्या मिनिटाला गोल डागून, पेरूची सलग १५ सामन्यांची विजयमालिका खंडित केली.
रशिया : डेन्मार्कनं पेरूवर १-० अशी मात करून, फिफा विश्वचषकात विजयाचं खातं उघडलं. डेन्मार्कच्या या विजयात युसूफ पोल्सनचा गोल निर्णायक ठरला. डेन्मार्कचा हा सलग सोळावा विजय ठरला. युसूफ पोल्सननं ५९ व्या मिनिटाला गोल डागून, पेरूची सलग १५ सामन्यांची विजयमालिका खंडित केली. पेरूचा संघ यंदा तब्बल ३६ वर्षांनी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. पण डेन्मार्कनं मिळवलेल्या विजयामुळं पेरूला विजयी पुनरागमन करण्यात यश आलं नाही. संबंधित बातम्या : FIFA World Cup 2018 : आईसलँडनं बलाढ्य अर्जेंटिनाला बरोबरीत रोखलं FIFA World Cup 2018 : नेमार स्वित्झर्लंडविरुद्ध मैदानात उतरणार FIFA World Cup 2018 : फ्रान्सची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियावर मात