नवी दिल्ली : काऊंटरपॉईंटने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या आठवड्यात सर्वाधिक स्मार्टफोन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कपंन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स कंपनी पहिल्या स्थानावर असून, दुसऱ्या स्थानावर अमेझॉन कंपनी आहे.
भारतात ऑनलाईन माध्यमातून स्मार्टफोन खरेदीत चार टक्क्यांनी वाढ झाल्याचेही काऊंटरपॉईंटच्या अहवालातून समोर आले आहे.
स्मार्टफोन विक्रीत वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाईट्सची तुलना केल्यास, फ्लिपकार्ट 54 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. अमेझॉनचा मार्केट शेअर 30 टक्के असून, अमेझॉन दुसऱ्या स्थानी आहे. तर 14 टक्के मार्केट शेअरसह शाओमी तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑनलाईन माध्यमातून कोणतं स्मार्टफोन सर्वाधिक खरेदी केले जाते, याचेही यादी काऊंटरपॉईंटने प्रसिद्ध केली असून, त्यात अनुक्रमे शाओमी, सॅमसंग आणि हुवावे यांचा क्रमांक लागतो.