FIFA U-17 Women’s World Cup 2022: फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. दरम्यान, मंगळवारी या स्पर्धेतील चार सामने खेळण्यात आले. ज्यात भारत आणि अमेरिका फुटबॉल सामन्याचाही समावेश आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय अंडर-17 महिला फुटबॉल संघाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेशी झाला. फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा पदार्पण सामना होता. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.अमेरिकेविरुद्ध सामन्यात भारताला 8-0 असा पराभव स्वीकारावा लागला.
फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अ गटातील या सामन्यात भारतीय संघ पहिल्या अर्ध्या तासात चार गोलांनी पिछाडीवर होता. पहिल्या हाफमध्ये अमेरिकेनं 5-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये अमेरिकेच्या संघानं आणखी तीन गोल करत यजमान देशाच्या विश्वचषक तयारीला आरसा दाखवला.
अमेरिकांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी
मागच्या अंडर-17 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या अमेरिकेच्या संघानं भारताविरुद्ध सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात अमेरिकाकडून मेलिना रेबिम्बासनं (9व्या आणि 31 व्या मिनिटाला) दोन गोल केले. तर, शार्लेट कोहलर (15व्या मिनिटाला), ओनेका गेमेरो (23 व्या मिनिटाला), गिसेले थॉम्पसन (39 व्या मिनिटाला), ईला इमरी (51 मिनिटाला), टेलर सुआरेज (59 व्या मिनिटाला) आणि कर्णधार मिया भूटानं (62 व्या मिनिटाला) प्रत्येकी एक-एक गोल केला.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाच दमछाक
फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचे हेड कोच थॉमस डेनरबी म्हणाले होते की, भारतीय संघ दिर्घकाळापासून विश्वचषकाची तयारी करत आहे. भारताविरुद्ध गोल करणं विरुद्ध संघाला संघर्ष करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु, अमेरिकाविरुद्ध सामन्यात याउलट पाहायला मिळालं.
भारताचे पुढील सामने कधी?
पहिल्या हाफमध्ये अमेरिकेच्या संघानं 70 टक्के बॉल त्यांच्याजवळ ठेवला. यादरम्यान फक्त दोनदा भारतीय संघाला अमेरिकेच्या संरक्षण रेषा पार करता आली.परंतु, एकदाही भारताला गोल करता आला नाही. भारताचा पुढचा सामना 14 ऑक्टोबर रोजी मोरक्को आणि 17 ऑक्टोबरला ब्राझीलशी होणार आहे.
हे देखील वाचा-