बंगळूर : न्यूझीलंडने चारशे धावा करूनही आज पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानच्या झंझावाती खेळीसमोर ती छोटीशी वाटली. मात्र, पावसाने पाकिस्तानच्या अडचणी कमी केल्या. विश्वचषकातील 35 व्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडविरुद्ध फखर जमानने शानदार फलंदाजी केली. फखर जमानने 81 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 11 षटकार मारले. फखर जमानने फक्त 3 सामन्यात 18 षटकार ठोकले आहेत. त्याचवेळी रोहित शर्मानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आहे. डेव्हिड वॉर्नरनेही 7 डावात 20 षटकार ठोकले. तर पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या विश्वचषकात आतापर्यंत भारतीय कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक षटकार मारले आहेत. यासोबतच आता पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानचाही या यादीत समावेश झाला आहे. फखर जमान सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर फखर जमान फक्त 3 सामने खेळला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 7 सामन्यात 20 षटकार ठोकले आहेत. या यादीत भारतीय कर्णधार अव्वल आहे.
जे शमीच्या बाबतीत घडलं तेच फखर जमानच्या बाबतीत घडलं
गेल्या तीन सामन्यात संधी मिळाल्यापासून झंझावाती कामगिरी करत असलेल्या फखर जमानला संघातून वगळण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तान चाचपडत असूनही संघाच्या रणनीतीवर सडकून टीका झाली. ICC विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध फखर झमान पाकिस्तान संघात परतला. त्याने ईडन गार्डन्सवर अर्धशतक ठोकून पुनरागमन संस्मरणीय केले. फखर आणि अब्दुल्ला शफीक यांनी 205 धावांचा पाठलाग करताना सलामीच्या विकेटसाठी 100 हून अधिक धावा जोडल्या. याआधी फखर जमानने बांगलादेशविरुद्ध 74 चेंडूत 81 धावा केल्या होत्या. फखर जमानने त्या डावात 3 चौकार आणि 7 षटकार मारले होते. त्यामुळे संतापलेल्या रवी शास्त्री यांनी पाकिस्तानने आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमध्ये जमानला खेळवले नाही? अशी विचारणा केली होती.
रवी शास्त्री म्हणाले की, फखर जमानला सर्व सामन्यांमध्ये खेळवण्यात आले नाही हे आश्चर्यकारक आहे. तो मॅचविनर आहे आणि त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये द्विशतक ठोकले आहे. झमान आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाचे मनोधैर्य खचवू शकतो. त्याने याआधीच सहा षटकार मारले आहेत, ज्याची पाकिस्तानला मागील सामन्यांमध्ये उणीव होती.
शमी सुद्धा पहिल्या चार सामन्यात बाहेर
दुसरीकडे, असाच काहीसा प्रकार शमीच्या बाबतीत झाला होता. पहिल्या चार सामन्यात त्याला बाकावर बसावे लागले होते. मात्र, नंतरच्या तीन सामन्यात धुवाँधार कामगिरी करत सगळा राग काढला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या