English Premier League : इंग्लिश प्रीमियर लीग (English Premier League) मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 6 खेळाडुना इंग्लिश प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशनच्या 'प्लेअर ऑफ द इयर' (PFA Player of The Year) पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि गेल्या दोन वर्षांपासून हा अवॉर्ड पटकावणाऱ्या केविन डी ब्रुयन (Kevin De Bruyne) चा समावेश आहे. 9 जून रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात विजेत्याची घोषणा केली जाणार आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो इंग्लिश प्रीमियर लीगच्या या सीझनमध्ये सर्वाधिक गोल डागणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण लीगमध्ये त्यानं एकूण 18 गोल डागले आहेत. रोनाल्डोनं यापूर्वीही हा अवॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी यूनाइटेडसोबत असताना म्हणजेच, 2007 आणि 2008 मध्ये त्यानं अवॉर्ड जिंकला होता.
लिव्हरपूलचे तीन खेळाडू शर्यतीत
लिव्हरपूलमधून मोहम्मद सालाह (Mohamed Salah) , सादियो माने (Sadio Mané) आणि वर्जिल वॉन डाइकही (Virgil van Dijk) या अवॉर्डसाठी शर्यतीत आहेत. सालाह EPL च्या या सीझनमध्ये सर्वाधिक गोल डागणारा आणि सर्वाधिक असिस्ट करणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं 23 गोल आणि 13 असिस्ट केले आहेत. तर साहियो मानेनं या सीझनमध्ये एकूण 16 गोल डागले आहेत. वॉन डाइकनं डिफेंसमध्ये दमदार कामगिरी केली. तो क्लीन शीट, बॉल क्लियरन्स आणि टॅकल करणारा सर्वोत्कष्ठ खेळाडू ठरलाय.
हॅरी केन (Harry Kane) आणि केविन डी ब्रुईसाठीही शानदार ठरलं हे सीझन
टोटेनहम हॉटस्परचा (Tottenham Hotspur) स्टार स्ट्रायकर हॅरी केननं EPL च्या या सीझनमध्ये 17 गोल डागले आणि 9 गोल्ससाठी असिस्ट केलं. त्याच्या दमदार खेळीमुळे त्याला पीएफए प्लेयर ऑफ दी ईयर पुरस्कारासाठी नॉमिनेट केलंय. मॅनचेस्टर सिटीच्या प्लेमेकर केविन डी ब्रुईनं (Kevin De Bruyne) दरवेळी सारखंच यंदाही क्लबला प्रीमियर लीगचं टायटल मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे केविन डी ब्रुईलाही या अवॉर्डसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आलं आहे.