Happy Birthday Mani Ratnam : काही दिग्दर्शक चित्रपटसृष्टीला अगदी वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. अशाच दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणजे मणिरत्नम (Mani Ratnam). बॉलिवूड, कॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये गेल्या 3 दशकांपासून उत्तम चित्रपट बनवत आहे. दिग्दर्शक मणिरत्नम 'सिनेमॅटिक जीनियस' म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या रोमँटिक चित्रपटांची एक वेगळीच क्रेझ असते. अनिल कपूर आणि लक्ष्मी अभिनीत ‘पल्लवी अनु पल्लवी’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर ‘रोजा’, ‘बॉम्बे’, आणि ‘दिल से’या चित्रपटांमुळे ते प्रसिद्ध झाले. या चित्रपटांनी प्रेक्षकांना भरपूर पसंती दर्शवली होती.


2 जून 1956 रोजी जन्मलेले मणिरत्नम आज आपला 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. सिनेसृष्टीतील या दिग्गज दिग्दर्शकाने अनेक उत्तमोत्तम चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या अशाच काही प्रसिद्ध चित्रपटांबद्दल...


बॉम्बे


इतिहासात असे काही चित्रपट आहेत, जे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात. मणिरत्नम यांचा ‘बॉम्बे’ हा असाच एक चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता अरविंद स्वामी आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाद्वारे, दिग्दर्शकाने केवळ उत्तम रोमान्सच दाखवला नाही, तर बॉम्बे, दंगल आणि बाबरी मशीद विध्वंस यासारख्या वादग्रस्त विषयांवरही लक्ष केंद्रित केले. कथानकासोबतच ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही संगीतप्रेमींच्या हृदयात घर करून आहेत.


रोजा


मणिरत्नम यांच्याकडे प्रत्येक चित्रपटाची सुरुवात रोमान्सने करण्याची आणि कठीण वास्तवासह समाप्त करण्याची जादू आहे. हीच त्यांची खासियत आहे. या चित्रपटाच्या पूर्वार्धात एका नवविवाहित जोडप्याची रोमँटिक कथा होती, तर शेवट काश्मीरच्या अतिरेक्यांनी एका भारतीय अधिकाऱ्याला पकडल्याबद्दलचा आहे. 1992चा रोमँटिक थ्रिलर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रचंड हिट झाला. या चित्रपटातही मणिरत्नम यांच्या दिग्दर्शनासह ए.आर. रहमानचे संगीत होते.


थलापती


मणिरत्नम हे एक दूरदृष्टी असलेली व्यक्ती आहेत, आणि हा चित्रपट याचा पुरावा आहे. ‘थलपती’ या चित्रपटात त्यांनी दोन सुपरस्टार अर्थात रजनीकांत आणि मामूट्टी यांना एकत्र आणले होते. कथानक इतके मजबूत होते की, सगळेच हा चित्रपट आजही आवडीने पाहतात. मणिरत्नम यांच्या या चित्रपटाची कथा महाभारतातील दुर्योधन आणि कर्ण यांच्यावरून प्रेरित होती.


गुरू


‘गुरु’ या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही खूप धमाल केली. या चित्रपटात एका माणसाचा प्रवास दाखवण्यात आला आहे, जो एका छोट्या गावातून व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतो आणि एक दिवस स्वतःहून एक यशस्वी माणूस बनतो.


दिल से


मणिरत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भलेही चांगला व्यवसाय करू शकला नसेल, परंतु लोकांना हा रोमँटिक ड्रामा खूप आवडला. या चित्रपटात शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा दहशतवादी पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांना आवडली.


हेही वाचा :