ENG-W vs IND-W 1st T20 : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात महिला टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमानुसार पराभवाचा सामना करावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्यात आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर इंग्लंड महिला संघाला 18 धावांनी विजयी घोषीत करण्यात आले. या विजयासह इंग्लंड महिला संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
त्याआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने नॅटली स्कायवर 55 (27) आणि अॅमी एलेन जोन्स 47 (27) यांच्या तडाखेबाज फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 7 विकेट्स गमावत 177 धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्ट आणि डॅनियल वॅट या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. डॅनियल वॅटला 31 धावांवर बाद झाली तर टॅमी ब्यूमॉन्टने 18 धावांचे योगदान दिले. इंग्लंडची कर्णधार अवघ्या सहा धावांवर बाद झाली. महिला टीम इंडियाकडून शिखा पांडेनं तीन तर राधा यादव आणि पूनम यादवनं एक एक विकेट घेतली.
इंग्लंडने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा शून्यावरच परतली नंतर आलेल्या हरलीन देओलसह स्मृती मानधनाने संघाचा डाव सावरला. दोघींनी पहिल्या दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. नंतर स्मृती मानधना 17 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 29 धावा करुन बाद झाली. तर कर्णधार हरमनप्रीत कौर केवळ एका धावेवर बाद झाली. यानंतर खेळादरम्यान पावसानं हजेरी लावली. पाऊस न थांबल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड महिला संघाला 18 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत इशांतच्या जागी सिराज, Playing 11मध्ये आणखी 'हे' बदल?