India vs Sri Lanka : श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षक आणि परफॉर्मन्स विश्लेषकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या वनडे सीरीजच्या वेळपत्रकात बदल करण्यात आली आहे. त्याचबरोबर टी20 सामने देखील पुढे ढकलण्यात आले आहे. 13 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामने खेळवण्यात येणार होते. परंतु आता संपूर्ण दौऱ्यातच बदल करण्यात आला आहे.


श्रीलंकेचे फलंदाज प्रशिक्षक ग्रन्ट फ्लावर यांना गुरुवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर परफॉर्मन्स विश्लेषक शिरांथा निरोशन यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनडे आणि  टी 20 सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली वनडे 17 जुलैला खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि तिसरा वनडेचे आयोजन 19 आणि 21 जुलैला आयोजन करण्यात आले आहे. तर टी20 सामान्यांची सुरुवात 21 जुलै ऐवजी 24 जुलैला खेळवण्यात येणार आहे.