IND Vs ENG: IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया चार ऑगस्टपासून पहिला कसोटी सामना खेळणार आहे. पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार आहेत. यात मोहम्मद सिराज इशांत शर्माच्या जागी खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे. दुखापतग्रस्त इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराज खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे. 


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात. सलामीवीर शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यानं मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी प्लेईंग 11 मध्ये मयंक अग्रवालला संधी मिळू शकते. तर न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलदरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या इशांत शर्माला देखीला पहिल्या कसोटीत बाहेर बसावं लागणार आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.  सोबतच टीम इंडिया चेतेश्वर पुजाराला देखील पहिल्या टेस्टमध्ये बाहेर ठेवू शकते. विराट कोहली तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करु शकतो. तर त्याच्याऐवजी केएल राहुलला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळू शकते. सोबतच हनुमा विहारीला देखील मध्यक्रमात संधी मिळू शकते.  


#BirthdaySpecial: मैदानावर पेय नेण्यास नकार दिल्याने जेव्हा संघातून वगळलं होतं; गांगुलीच्या 'दादा'गिरीचे न ऐकलेले किस्से


इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी नॉटिंघम येथे होणार आहे. त्यानंतर लॉर्ड्सवर 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान दुसरी कसोटी तर लीड्सवर 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान तिसरी कसोटी आणि द ओव्हलवर 2 ते 6 सप्टेंबर या काळात चौथी आणि अंतिम कसोटी मॅनचेस्टर येथे 10 सप्टेंबरपासून होणार आहे. 


ICC Men's ODI Player Rankings: वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठा बदल; ख्रिस वॉक्स कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंगमध्ये


भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अंग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.