India Open 2022 Final : इंडिया ओपन 2022 (India Open 2022) या स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत स्पर्धा जिंकली आहे. इंडिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन टूर्नामेंटच्या या पुरुष दुहेरीच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवत विजय मिळवला. त्यांनी फायनलमध्ये इंडोनेशियाचे (Indonesia) दिग्गज खेळाडू हेंड्रा सेतियावान आणि मोहम्मद एहसान यांच्या जोडीला नमवत हा विजय मिळवला आहे.
चिराग आणि सात्विक यांनी नमवलेली ही इंडोनेशियाची जोडी सद्यस्थितीला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावार आहे. या सामन्यात चिराग आणि सात्विक यांनी दोन सेट्मसमध्ये हा विजय मिळवला आहे. यामध्ये पहिल्या सेटमध्ये चिराग आणि सात्विकने धमाकेदार खेळ दाखवला. ज्यामुळे हा सेट त्यांनी 21-16 अशा चांगल्या फरकाने नावावर केला. तर दुसऱ्या सेटमध्ये मात्र इंडोनेशियाच्या खेळाडूंनी सामन्यात पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण अखेर या अटीतटीच्या सेटमध्ये देखील 26-24 ने चिराग-सात्विक जोडीनेच विजय मिळवत चॅम्पियनशिपचा खिताब पटकावला.
जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर असणाऱ्या चिराग आणि सात्विक यांची जोडीने दुसऱ्या क्रमाकांच्या इंडोनेशियन जोडीला मात दिल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. या जोडीने दुसऱ्यांदा अशाप्रकारच्या सुपर 500 टूर्नामेंटमध्ये विजय मिळवला आहे. याआधी त्यांनी 2019 मध्ये थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन टूर्नांमेंटमध्ये विजय मिळवला होता.
हे ही वाचा-
- नोवाक जोकोविचला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर; तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियातही बंदी
- Virat Kohli : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले
- Captaincy Record: विराट तिसऱ्या स्थानी, जगातील अव्वल दहा कसोटी कर्णधार, पाहा यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha