अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अर्जेंटिनाच्या मीडियाने याबाबत माहिती दिली. मॅराडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅराडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. एका स्कॅनमध्ये मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली. यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मॅराडोना यांची कोरोना टेस्ट देखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आली. 1986 मध्ये, त्यांनी अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता.


30 ऑक्टोबरला मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते. त्यांच्या बॉडीगार्डला कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यानंतर गेल्या आठवड्यात मॅराडोना स्वत: आयसोलेशनमध्ये गेले होते.


1986 मध्ये अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला


मॅराडोना यांनी चार फिफा विश्वचषक खेळले होते. 1986 सालचा फुटबॉल वर्ल्डकप अर्जेटिनाला जिंकून देण्यात मॅराडोना यांचा सिंहाचा वाटा होता. 1986 मध्ये जेव्हा अर्जेटिनाने विश्वचषक जिंकला तेव्हा ते संघाचा कर्णधार होते.


30 ऑक्टोबरला केला होता 60 वा वाढदिवस
30 ऑक्टोबरला मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते.


3 नोव्हेंबरला झाली होती शस्त्रक्रिया


मॅराडोना यांच्या मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली होती. त्यावर 3 नोव्हेंबरला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेच्या एका आठवड्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते.