केपटाऊन : भारताच्या महेंद्रसिंग धोनीनं वन डे कारकीर्दीत यष्टीपाठी चारशे विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला तर जगातला केवळ चौथा यष्टिरक्षक ठरला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत एडन मारक्रमला यष्टिचीत करून धोनीनं हा चारशे विकेट्सचा टप्पा गाठला. मग त्यानं डेव्हिड मिलरचा झेल पकडून आपल्या यष्टिपाठच्या विकेट्सची संख्या 401 वर नेली.

धोनीनं 315 वन डेत यष्टीमागे 295 झेल आणि 106 यष्टिचीत अशी कामगिरी बजावली आहे. श्रीलंकेच्या कुमार संगकारानं वन डेत यष्टीपाठी सर्वाधिक 482 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टनं 472 आणि दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरनं 424 विकेट्स घेतल्या आहेत.