होबार्ट : तिरंगी मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 5 विकेट्सने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीची मोठी भागिदारी आहे. 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूला षटकार ठोकत मॅक्सवेलने टी-20 किकेटमधील दुसरं शतक पूर्ण केलं.
पहिल्या दोन षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स गेल्या, त्यानंतर मॅक्सवेल मैदानात आला आणि त्यानंतर त्याने 103 धावांची खेळी केली. मॅन ऑफ द मॅचही मॅक्सवेलच ठरला.
ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडने 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 19 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या बदल्यात 161 धावा बनवून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
या सामन्यात मॅक्सवेलने शतक ठोकलंच, त्याचवेळी गोलंदाजीतही कमाल केली. मॅक्सवेलने अवघ्या 10 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. पहिल्यांदाच असे झाले आहे की, कुणा खेळाडूने एकाच सामन्यात शतकही ठोकले आणि उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन विकेट्सही घेतल्या.
मॅक्सवेलने 103 धावांची खेळी 58 चेंडूत पूर्ण केली. यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.
याआधी इंग्लंडच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियन स्पिनर्सचा सामना करावा लागला आणि त्यामुळे त्यांना 9 विकेट्सच्या बदल्यात केवळ 155 धावांची खेळी करता आली. यामध्ये डेव्हिड मालनने 36 चेंडूंच्या बदल्यात 50 धावा केल्या. अॅलेक्स हेल्स आणि इऑन मॉर्गन यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या.
टी-20 क्रिकेटमध्ये मॅक्सवेलच्या नावावर अनोखा विक्रम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Feb 2018 08:47 PM (IST)
ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडने 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 19 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या बदल्यात 161 धा बनवून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -