KBC 14 : छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी भार स्वतंत्र होऊन 75 वर्ष होणार आहे. या  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कौन बनेगा करोडपतीमध्ये एक आठवडा वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. आमिर खान (Aamir Khan), डी.पी सिंह , मिताली मधुमिता, एम.सी.मेरी कॉम आणि सुनीळ छेत्री हे मान्यवर या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. कौन बनेगा करोडपती -14 च्या आगमी एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सुनील छेत्री (Sunil Chhetri) आणि मेरी कॉम (Mary Kom) हे अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजेशीर गप्पा मारत आहेत. 


प्रोमोमध्ये कौन बनेगा करोडपती- 14 या शोमध्ये मेरी कॉम, सुनील छेत्री आणि अमिताभ बच्चन हे गप्पा मारताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे सुनील यांना विचारतात, 'तुम्हाला कधी रेड कार्ड मिळालं आहे का?' या कधीच नाही. येलो कार्डलाच आम्ही खाबरतो. जेव्हा यलो कार्ड मिळते तेव्हा आम्ही सगळे अभिनेता होते.' पुढे अमिताभ बच्चन हे सुनील यांना फुलबॉल स्किल्स दाखवायला सांगतात. 


पाहा प्रोमो:






'कौन बनेगा करोडपती 14' चा नवा नियम


'कौन बनेगा करोडपती 14' चा नवा नियम 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळत असतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे.


हेही वाचा: 


KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'चा 7 ऑगस्टला होणार प्रीमियर; आमिर खानची विशेष उपस्थिती