Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेत आतापर्यंत 128 सुवर्णपदकांचा निर्णय झालाय. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 13 पदक जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. एकूण 13 पदकांसह, भारत सध्या राष्ट्रकुल 2022 च्या पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 42 सुवर्णपदकासह एकूण 106 पदकं जिंकली आहेत. तर, 31 सुवर्णपदकासह एकूण 86 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या खात्यात आतापर्यंत 13 सुवर्णपदकासह एकूण 26 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर कॅनडा (11 सुवर्ण, एकूण 46 पदक), पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (6 सुवर्ण, एकूण 16 पदक), सहाव्या क्रमांकावर भारत (5 सुवर्ण पदक, एकूण 13 पदक), सातव्या क्रमांकावर स्कॉटलँड (3 सुवर्ण, एकूण 26 पदक), आठव्या क्रमांकावर वेल्स (3 सुवर्ण, एकूण 13 पदक), नवव्या क्रमांकावर मलेशिया (3 सुवर्ण, एकूण 8 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर नायजेरिया (2 सुवर्ण, एकूण 5 पदक). 

राष्ट्रकुल स्पर्धा पदकतालिका 2022-

क्रमांक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 ऑस्ट्रेलिया 42 32 32 106
2 इंग्लंड 31 34 31 86
3 न्यूझीलंड 13 7 6 26
4 कॅनडा 11 16 19 46
5 दक्षिण आफ्रिका 6 5 5 16
6 भारत 5 5 3 13
7 स्कॉटलँड 3 8 15 26
8 वेल्स 3 2 8 13
9 मलेशिया 3 2 3 8
10 नायजेरिया 2 1 2 5

आजचा दिवस सौरव घोषालसाठी संस्मरणीय ठरण्याची शक्यता
आजचा दिवस भारताचा अनुभवी स्क्वॉशपटू सौरव घोषालसाठी खूप संस्मरणीय ठरू शकतो. पुरुष एकेरीत जोएल माकिनविरुद्ध तो कांस्यपदकासाठी दावेदारी करेल. जर सौरव जिंकण्यात यशस्वी ठरला, तर त्याचं हे पहिले राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक असेल.

अॅथलीट मनप्रीत कौरच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष
अॅथलेटिक्समध्ये भारतीय अॅथलीट मनप्रीत कौरवर महिलांच्या गोळा फेक स्पर्धेत पदकावर लक्ष असेल, तर तेजस्वीन शंकरलाही पुरुषांच्या उंच उडीत पदक जिंकून बर्मिंगहॅममध्ये देशाचा तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न असेल.

हे देखील वाचा-