Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्क्वॉश मिश्र दुहेरी स्पर्धेतील कांस्यपदकाच्या सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. कांस्यपदकाच्या लढतीत दीपिका पल्लीकल (Deepika Pallikal) आणि सौरव घोषाल (Sourav Ghosal) या जोडीनं लॉबन डोना आणि पायली कॅमेरॉन या ऑस्ट्रेलियन जोडीचा 2-0 असा पराभव केलाय. पल्लीकल आणि सौरव यांनी पहिला सेट 11-8 आणि दुसरा सेट 11-4 अशा फरकानं जिंकलाय.

Continues below advertisement


2018 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत दीपिका आणि सौरवनं रौप्य पदक जिंकलं होतं. मात्र, यावेळी या जोडीला काही खास कामगिरी करता आली नाही. उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागलेल्या या जोडीनं कांस्यपदकाच्या लढतीत दमदार कामगिरी केली. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत 50 पदकं जिंकली आहेत. 


ट्वीट-




भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू


सुवर्णपदक-17: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी), नीतू घणघस, अमित पंघल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन.


रौप्यपदक-13: संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर. 


कांस्यपदक- 20: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी, स्क्वॉश मिश्र दुहेरी संघ)


हे देखील वाचा-