Manish Paul Birthday : कॉमेडियन आणि अभिनेता मनीष पॉलचा (Manish Paul) आज (2 ऑगस्ट) 41 वा वाढदिवस आहे. मनीषचा जन्म 3 ऑगस्ट 1981 रोजी दिल्लीमधील मालवीय नगर येथे झाला. मनी हा होस्ट, अभिनेता आणि आरजे देखील आहे. मनीष त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आज त्याच्या वाढदिवसनिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबाबत खास गोष्टी...

 

कशी झाली करिअरची सुरुवात 

दिल्लीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनीष मुंबईमध्ये आला. मनीषनं इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. या काळात मीनषच्या पत्नीनं म्हणजेच  संयुक्तानं मनीषची साथ दिली. 2002 मध्ये मनीषनं ‘संडे टँगो' हा त्याचा पहिला शो होस्ट केला. त्यानंतर मनीषनं व्हिजे म्हणून देखील काम केलं. रेडिओ सिटीमध्ये आरजे होऊन त्यानं  'कसाकाय मुंबई' या  मॉर्निंग शो होस्ट केला. त्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली. 

 

बालपणीच्या मैत्रिणीसोबत केलं लग्न

मनीष पॉलनं 2007 मध्ये त्याच्या बालपणीची मैत्रिण संयुक्तासोबत लग्न केलं. संयुक्ता आणि मनीष हे 1998 पासून एकमेकांना डेट करत होते. मनीष आणि संयुक्ताला एका मुलगी आणि एक मुलगा आहे. 

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत आहे खास कनेक्शन 

मनीष पॉल हा अमिताभ बच्चन यांचा चाहता आहे. तो दरवर्षी वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद घ्यायला जातो. मनीषचं मत आहे की, अमिताभ यांच्यासोबत त्याचं खास कनेक्शन आहे त्यामुळे तो दरवर्षी वाढदिवसाला त्यांचा आशिर्वाद घेतो. 

 

चित्रपट आणि मालिकांमध्ये केलं काम 

'घोस्ट बना दोस्त', 'राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी', 'जिंदादिल', 'कहानी शुरू विद लव्ह गुरु' या मालिकांमध्ये मनीष काम केलं आहे.  'तीस मार खां' 'मिक्की वायरस' आणि काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'जुग जुग जियो' या चित्रपटांमध्ये मनीषनं प्रमुख भूमिका साकारली. 

 

हेही वाचा: