Birmingham 2022 Commonwealth Games Day 7: ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ 2022 मध्ये गुरुवारी सर्वांच्या नजरा मुरली श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया या भारतीय खेळाडूंवर असतील. दोन्ही खेळाडूंनी लांब उडीच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलंय. एम श्रीशंकर गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि तो आज भारताच्या पदकतालिकेत वाढ करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 


अमित पंघालचा सामना स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनशी होणार
भारतीय बॉक्सर अमित पंघालही पदक जिंकण्याच्या उद्देशानं रिंगमध्ये आपले आव्हान सादर करेल. गोल्ड कोस्ट 2018 रौप्यपदक विजेत्या पंघलचा बर्मिंगहॅम 2022 मध्ये पुरुषांच्या 51 किलो फ्लायवेट स्पर्धेत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनशी सामना होईल. अमित व्यतिरिक्त, त्याचे सहकारी बॉक्सर जास्मिन लॅम्बोरिया, सागर आणि रोहित टोकस यांनीही उपांत्यपूर्व फेरीतील लढती जिंकल्यास बर्मिंगहॅम 2022 मध्ये भारतासाठी आणखी पदके निश्चित होतील.


हिमा दास मोहिमेची सुरुवात करणार
स्टार अॅथलीट हिमा दास कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रथमच ट्रॅकवर दिसणार आहे. ती 200 मीटर हीटमध्ये आपला दावा मांडणार आहे. हिमादास पहिल्यांदाच कॉमनवेल्ममध्ये 200 मीटरमध्ये स्पर्धा करणार आहे. तिनं गोल्ड कोस्ट 2018 येथे 400 मीटर हीटमध्ये तिचा दावा केला होता, जिथं तिनं सहावं स्थान पटकावलं होतं.


स्क्वॉश मिश्र दुहेरीत सौरव घोषाल- दीपिका पल्लीकल नशीब आजमावतील
कॉमनवेल्थ गेम्स 2022 एकेरी कांस्यपदक विजेता सौरव घोषाल स्क्वॉश स्पर्धेत दीपिका पल्लीकलसह मिश्र दुहेरीत खेळणार आहे. तर, युवा खेळाडू अनाहत सिंह आणि सुनयना कुरुविला महिला दुहेरी स्पर्धेत छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.


भारतीय पुरुष हॉकी संघ अव्वल स्थान गाठण्याचा प्रयत्न
भारतीय पुरुष हॉकी संघ वेल्सविरुद्धचा अंतिम गट सामना जिंकून पूल ब मध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.


सांघिक स्पर्धांमध्ये पदके जिंकणारे बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्टार गुरुवारपासून आपापल्या एकेरी आणि दुहेरीच्या मोहिमेला सुरुवात करतील. बॅडमिंटन सामना खेळणारी पीव्ही सिंधू ही पहिली भारतीय शटलर असेल.


कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारतीयांचं सातव्या दिवसाचं वेळापत्रक-


ऍथलेटिक्स
महिला हॅमर थ्रो, पात्रता फेरी : सरिता सिंह, मंजू बाला - दुपारी 2:30 वा.
महिला 200 मी, हीट 2: हिमा दास - दुपारी 3:03 नंतर
पुरुषांची लांब उडी अंतिम सामना: मुरली श्रीशंकर, मोहम्मद अनीस याहिया - दुपारी 12.12 वा. (5 ऑगस्ट)


बॅडमिंटन
महिला एकेरी, राऊंड 32: पीव्ही सिंधू विरुद्ध फातिमथ नबाहा अब्दुल रज्जाक- दुपारी 3.00 वा.
पुरुष एकेरी, राऊंड 32: किदाम्बी श्रीकांत विरुद्ध डॅनियल वनाग्लिया (युगांडा) - रात्री 9:30 वा.
मिश्र दुहेरी, राऊंड 32: बी सुमित रेड्डी / अश्विनी पोनप्पा विरुद्ध कॅलम हेमिंग / जेसिका पग (इंग्लंड) - दुपारी 4:00 वा.
पुरुष एकेरी, राऊंड 32: लक्ष्य सेन विरुद्ध व्हर्नॉन स्मेड (SHN)- रात्री 11:30 वा.
महिला एकेरी, राऊंड 32: माहूर शहजाद (पाकिस्तान) विरुद्ध अक्षरी कश्यप - रात्री 10 नंतर


बॉक्सिंग
पुरुष फ्लायवेट, उपांत्यपूर्व फेरी: अमित पंघल विरुद्ध लेनन मुलिगन (स्कॉटलंड) - दुपारी 4:45 वा.
महिला लाइटवेट उपांत्यपूर्व फेरी: ट्रॉय गार्टेन (NZ) विरुद्ध जास्मिन- संध्याकाळी 6:15 वा.
पुरुष सुपरहेवीवेट, उपांत्यपूर्व फेरी: केडी इव्हान्स अॅग्नेस (सेशेल्स) विरुद्ध सागर - रात्री 8.00 वा.
पुरुष वेल्टरवेट, उपांत्यपूर्व फेरी: रोहित टोकस विरुद्ध जेवियर मटाफा- इकिनोफो - दुपारी 12:30 (5 ऑगस्ट)


हॉकी
पुरुषांचा पूल ब: भारत वि वेल्स - संध्याकाळी 6:30 वा.


लॉन बॉल्स
पुरुष एकेरी, सेक्शन डी: रॉस डेव्हिस विरुद्ध मृदुल बोरगोहेन - दुपारी 4:00


स्क्वॅश
महिला दुहेरी, राऊंड 32: सुनैना कुरुविला/ अनाहत सिंग वि. येहेनी कुरुप्पू / सिनाली चनिथामा (श्रीलंका) - संध्याकाळी 5.30 वा.
पुरुष दुहेरी, राऊंड 32: व्ही सेंथिलकुमार/ अभय सिंह विरुद्ध लुका रीच/ जो चॅपमन (IVB) - संध्याकाळी 6:00 वा.
मिश्र दुहेरी, राऊंड 16: जोश्ना चिनप्पा / हरिंदर पाल सिंग संधू विरुद्ध डोना लोबन विरुद्ध कॅमेरून पिल्ले (ऑस्ट्रेलिया) - संध्याकाळी 6 वा.
मिश्र दुहेरी, राऊंड 16: दीपिका पल्लीकल/सौरव घोषाल वि एमिली व्हिटलॉक/पीटर क्रीड (WAL) - संध्याकाळी 7:00 वा.
महिला दुहेरी, राऊंड 16: जोश्ना चिनप्पा / दीपिका पल्लीकल विरुद्ध - TBD रात्री 11:45 वाजता


टेबल टेनिस
मिश्र दुहेरी राऊंड 64: सानील शेट्टी/रीथ टेनिसन विरुद्ध वोंग क्यू शेन/ताए जिन (एमएएस) - दुपारी 2 वा.
 मिश्र दुहेरी, राऊंड 32: साथियान ज्ञानसेकरन/माणिका बत्रा वि TBD - रात्री 8:30 वा.
मिश्र दुहेरी राऊंड 32: टीबीडी वि शरथ कमल/श्रीजा अकुला - रात्री 9.10 वा.
महिला एकेरी, राऊंड 32: शार्लोट बार्डस्ले (इंग्लंड) विरुद्ध रीथ टेनिसन - रात्री 10:00 वा.
महिला एकेरी, राऊंड 32: श्रीजा अकुला विरुद्ध कॅरेन लिन - रात्री 10:00 नंतर
महिला एकेरी, राऊंड 32: : चिंग नाम फू (CAN) वि मनिका बत्रा - रात्री 10:45 वा.
पुरुष दुहेरी, राऊंड 32: लोसिफ इलिया/क्रिस्टोस सावा (सायप्रस) वि हरमीत देसाई/सनील शेट्टी - रात्री 11.30 वा.
पुरुष दुहेरी, राऊंड 32: जोएल अॅलेन/जोनाथन व्हॅन लॅन्गे (गियाना) विरुद्ध अचंता शरथ कमल/साथियान गणनासेकरन - दुपारी 12:10 वा. (5 ऑगस्ट)