CWG 2022 Day 11 Live Updates: कॉमनवेल्थ स्पर्धेतील आज शेवटचा दिवस, अकराव्या दिवसाचं प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Commonwealth Games 2022 Live Updates: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेतील शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या नजरा पाच सुवर्णपदकं जिंकण्यावर असतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Aug 2022 06:35 PM
CWG 2022 Live: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव, रौप्यपदकावर मानावे लागले समाधान

कॉमनवेल्थमध्ये पुरुष हॉकी सामन्याचा गोल्ड मेडलसाठी पार पडलेल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने 7-0 ने मात दिली. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

CWG 2022 Live Updates: सात्विक-चिराग जोडीनं पहिला सेट जिंकला

कॉमनवेल्थ बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडी सात्विक- चिरागच्या जोडीनं इंग्लंडविरुद्ध पहिला सेट जिंकला आहे. 


 

CWG 2022 Live: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हॉकी सामना, कांगारुची आघाडी

कॉमनवेल्थमध्ये पुरुष हॉकी सामन्याचा गोल्ड मेडलसाठी सुरु असलेल्या सामन्यात भारत सध्या पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये 2 गोल करत 2-0 ची आघाडी घेतली आहे.

CWG 2022 Live: लक्ष्य सेन-  के एंग जे यॉन्ग यांच्यातील सामना रोमांचक स्थितीत

लक्ष्य सेन आणि मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग यांच्यात कॉमनवेल्थ स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातील पहिल्या सेटममध्ये एंग जे यॉन्गनं विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सेट जिंकत लक्ष्य सेननं सामन्यात पुनरागमन केलंय. 

CWG 2022 Live: लक्ष्य सेनकडून सुवर्णपदकाची अपेक्षा

पीव्ही सिंधूनंतर पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या यंगशी सुरू आहे. या सामन्यात लक्ष्य सेनकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. यंगनं उपांत्य फेरीच्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतचा पराभव केला होता. अशा स्थितीत अंतिम सामनाही लक्ष्यासाठी सोपा नसेल.

CWG 2022 Live: पीवी सिंधूनं पहिला सेट जिंकला

कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं पहिला सेट जिंकलाय. कॅनडाच्या  मिशेल लीशीविरुद्ध पीव्ही सिंधूनं 21-15 फरकानं पहिला सेट जिंकलाय.


 

CWG 2022 Live: पीव्ही सिंधूचा सामन्याला सुरुवात

बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामन्याला सुरुवात झालीय. भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल ली आमने- सामने आहेत. सिंधू या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिली असून तिला हा सामना जिंकून सुवर्णपदकावर कब्जा करण्यासाठी ती मैदानात उतरली आहे. 

पार्श्वभूमी

Commonwealth Games 2022 Live Updates: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेतील शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या नजरा पाच सुवर्णपदकं जिंकण्यावर असतील. भारतानं सध्या 18 सुवर्णांसह 55 पदकं जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी शेवटच्या दिवशी पाच सुवर्णपदके जिंकली, तर त्यांना पदकतालिकेत मोठा फायदा होईल.


भारतीय हॉकी संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा
कॉमनवेल्थ गेम्सच्या मोठ्या सामन्यांमध्ये आज भारतीय खेळाडू दिसणार आहेत. भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकासाठी ऑस्ट्रेलियाशी अंतिम सामना खेळणार आहेत. कॉमनवेल्थ हॉकी स्पर्धेत भारतान सुवर्णपदक जिंकून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावा, अशी भारतीयांची इच्छा आहे. 


बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू दाखवणार दम
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूही महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकाच्या लढतीत दिसणार आहे. लक्ष्य सेन त्याच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहे. अचंता शरथ कमलची नजर टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकावर असेल. दुपारी 1.20 वाजता पीव्ही सिंधूचा सामना मिशेल लीशी होईल. यानंतर, दुपारी 2.10 वाजता लक्ष्य सेन जी योंग एनजीशी स्पर्धा करेल. सात्विकसाई राज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध बेन लेन आणि शॉन वेंडी (पुरुष दुहेरी सुवर्णपदक सामना) दुपारी 3 वाजता खेळला जाईल. 4.25 वाजता, अचंता शरथ कमल विरुद्ध लियाम पिचफोर्ड पुरुष एकेरी सुवर्णपदक सामन्यात भिडताना दिसेल. संध्याकाळी ५ वाजता हॉकीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहायला मिळणार आहे. 


भारतानं आतापर्यंत किती पदकं जिंकली?
कॉमनवेल्थ गेम्समधील भारताच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर भारताने आतापर्यंत 55 पदके जिंकली आहेत. भारताला 18 सुवर्ण व्यतिरिक्त 15 रौप्य आणि 22 कांस्य पदके जिंकण्यात यश आले आहे.


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.