Commonwealth Games 2022: भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघालनं (Amit Panghal) कॉमनवेल्थ स्पर्धेत विजयानं सुरुवात केलीय. अमित पंघालनं त्याच्या पहिल्याच सामन्यात वनुआटूच्या नामारी बेरीचा (Namari Berry) पराभव केला. या विजयानंतर अमित पंघालनं बॉक्सिंगच्या क्वार्टरफायनलमध्ये एन्ट्री केलीय. या सामन्यात अमित पंघालनं जबरदस्त कामगिरी करून दाखवली. पहिल्या दोन फेरीत नामरी बेरीवर दबाव निर्माण केला. या सामन्यात मोठ्या शिताफिनं नामरी बेरीला पराभूत केलं. 


अमित पंघालचं दमदार प्रदर्शन 
अमितनं सामन्याची शानदार सुरुवात केली आणि तीन्ही फेऱ्यांमध्ये 10-10 गुण मिळवले. बेरीनं पहिल्या फेरीत नऊ गुण मिळवले होते. पण पुढच्या दोन फेरीत तो आठ गुणांच्या पुढे जाऊ शकला नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अमितविरुद्ध तो संघर्ष करताना दिसला. तसेच अमितनंही त्याला सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिली नाही. 


ट्वीट-



निकहत झरीन उपांत्यपूर्व फेरीत
निकहत झरीनं महिलांच्या लाइटवेट प्रकारात मोझांबिकच्या हेलेना इस्माईल बागाओचा पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत निकहत झरीनचा सामना न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनशी सामना होईल. हेलेना इस्माईल बागाओला पराभूत केल्यानंतर निकहत झरीन म्हणाली की, "पहिला सामना जिंकल्याचा मला आनंद आहे आणि पुढच्या फेरीत चांगली कामगिरी करण्यासाठी मी तयार आहे. मी पदकापासून फक्त एक सामना दूर आहे पण मी येथे सुवर्ण जिंकण्यासाठी उत्सुक आहे."


श्रीहरी नटराजची 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनलमध्ये धडक
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं. भारताच्या क्रिकेट, हॉकी संघानं आपपले सामने जिंकूले. तर, भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनं (Srihari Nataraj) 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनमध्ये जागा निश्चित केलीय. त्याच्याकडं 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनलमध्ये विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. यामुळं संपूर्ण भारतीयांच्या नजरा लक्ष श्रीहरी नटराजच्या कामगिरीवर असणार आहेत.


हे देखील वाचा-