सिडनी : 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंकडून पदकांची लयलूट सुरुच आहे. पैलवान बजरंग पुनियाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाईल 65 किलो वजनी गटात बजरंगला सुवर्ण मिळालं.

पैलवान पूजा धांडा हिनेही बजरंगपाठोपाठ रौप्यपदकाची कमाई केली. महिलांच्या फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटात पूजाला रौप्य मिळालं. ओदुनायो आदेकुओरोयेकडून हार स्वीकारावी लागल्यामुळे तिचं सुवर्णपदक हुकलं.



पैलवान दिव्या काकरन हिने महिलांच्या फ्रीस्टाईल 68 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवलं. बांगलादेशच्या शेरीन-सुलतानावर तिने 4-0 ने मात केली.



बॉक्सर नमन तन्वरने पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली.



ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 38 वर पोहचली आहे. त्यात 17 सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारत पदतालिकेत सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून यजमान ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे.

त्याआधी, नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. 30 गुणांच्या कमाईसह अनिशने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

विशेष म्हणजे अनिश भानवाला अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्यामुळे अनिश राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे.



महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये दमदार कामगिरीचा सपाटाच लावला आहे. कोल्हापूरची कन्या, नेमबाज तेजस्विनी सावंत सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रकुल स्पर्धेत चमकली. तेजस्विनीने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये सुवर्णपदक पटकावलं. तर भारताच्याच अंजुम मोदगिलने रौप्य पदकाची कमाई केली.

457.9 गुणांची कमाई करत तेजस्विनीने नवीन गेम रेकॉर्ड नोंदवला. भारताची नेमबाज अंजुम मोदगिलनेही 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये रौप्यपदकाची कमाई केली. अंजुमने 455.7 गुण पटकावले. तिसऱ्या स्थानावर स्कॉटलंडची नेमबाज होती.


गुरुवारीच महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात तेजस्विनीने रौप्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवसाची सुरुवात पुन्हा तेजस्विनीने आनंदाची बातमी देऊन केली.




ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 38 पदकांची कमाई केली आहे. भारताने 17 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकांची कमाई केली आहे. भारत पदतालिकेत सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून यजमान ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे.

भारताने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा यावेळी जास्त सुवर्णपदकं कमावली आहेत. 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (ग्लास्गो, स्कॉटलंड) भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 64 पदकं कमावली होती. पदतालिकेत गेल्या वेळी भारत पाचव्या स्थानावर होता.

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 65 किलो वजनी गट) बजरंग पुनिया सुवर्ण


कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) पूजा धांडा रौप्य


कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 68 किलो वजनी गट) दिव्या काकरन कांस्य


बॉक्सिंग (पुरुष 91 किलो वजनी गट) नमन तन्वर कांस्य

नेमबाजी (पुरुष 25 मीटर रॅपीड पिस्टल) अनिश भानवाला सुवर्ण

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) अंजुम मोदगिल रौप्य 

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) तेजस्विनी सावंत सुवर्ण


थाळीफेक - सीमा पुनिया रौप्य 

थाळीफेक - नवजीत धिल्लन कांस्य

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 74 किलो वजनी गट) सुशीलकुमार सुवर्ण

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 76 किलो वजनी गट) किरण कांस्य

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) राहुल आवारे सुवर्ण

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 53 किलो वजनी गट) बबिता फोगट रौप्य

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल प्रोन) तेजस्विनी सावंत रौप्य

नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य

नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य

नेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण

बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण

टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य


नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य

टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य


वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य

गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी

भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरीही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.

2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं अशी लयलूट भारताने केली आहे

संबंधित बातम्या :
...म्हणून महावीर फोगाट यांना बबिताची फायनल पाहता आली नाही!

'हरिश्चंद्राच्या फॅक्टरी'तला पैलवान!

मरणाची मेहनत करुन पोरगं जिंकलं, राहुलच्या यशाने वस्ताद भारावले

वायूवेगाने विजय, पैलवान सुशीलकुमारला 80 सेकंदात सुवर्ण!

वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!

सलग 3 कुस्त्या खेळून दमली, तरीही लढली, बबिताकुमारी रौप्यपदक जिंकली !

CWG2018: सव्वा तासात 3 विजय, महाराष्ट्राचा राहुल आवारे अंतिम फेरीत!

CWG 2018 : महाराष्ट्रातील पदकविजेत्यांना सरकारकडून रोख इनाम

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून या देशाचे पाच खेळाडू बेपत्ता

CWG 2018 : श्रेयसीला सुवर्ण, अंकुर आणि ओमची कांस्यकमाई

CWG 2018 : हीना सिद्धूला सुवर्ण, यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदक

CWG 2018: भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक

CWG 2018 : महिला-पुरुष नेमबाजीत एकाच दिवशी 4 पदकं

CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’

CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य

CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण

CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण

CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक

CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण

CWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण

GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी