सिडनी : 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सुवर्ण घोडदौड सुरुच आहे. महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात भारताला दुहेरी यश मिळालं. मेहुली घोषने रौप्य, तर अपूर्वी चंदेलाने कांस्यपदक पटकावलं.

मेहुली आणि सिंगापूरच्या मार्टिना वेलोसो यांनी अंतिम फेरीत 247.2 अशा सारख्याच गुणांची कमाई केली होती. मात्र शूट ऑफमध्ये मार्टिनाने बाजी मारुन सुवर्ण पटकावलं. अपूर्वीने 225.3 गुण मिळवून कांस्य मिळवलं.

त्याआधी, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जितू रायने सुवर्णपदक पटकावलं, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळालं.

जितूने 235.1 गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 214.3 गुण मिळवणाऱ्या ओम मिथरवालने कांस्य पटकावलं. ऑस्ट्रेलियाच्या कॅरी बेलला रौप्य पदक मिळवलं.

नेपाळमध्ये जन्म झालेल्या जितूने वयाच्या 20 व्या वर्षी भारतीय सैन्यात प्रवेश केला. मात्र त्याचं नशिब त्याला नेमबाजीच्या खेळात घेऊन आलं. जगभरात पिस्टलकिंग अशी ख्याती असलेल्या जितूने नेमबाजीत अनेक पदकं जिंकली आहेत.

पाचव्या दिवसाची सुरुवात वेटलिफ्टींगमधील रौप्यपदकाने झाली. भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंग याने 105 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं.

नेमबाजीत दोन स्पर्धांमध्ये भारताला दुहेरी यश मिळालं. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जितू रायने सुवर्णपदक, तर ओम मिथरवाल याने कांस्यपदक मिळवलं. तसंच महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात मेहुली घोषने रौप्य, तर अपूर्वी चंदेलाने कांस्यपदक पटकावलं.

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 17 पदकांची कमाई केली आहे.  भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकाची कमाई केली आहे.

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य


नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य

टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य


वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य

गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी

भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.

2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय 225 शिलेदारांचं भारतीय पथक.

संबंधित बातम्या :
CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’

CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य

CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण

CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण

CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक

CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण

CWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण

GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी