IPL 2021 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडूच आहेत. यंदा भारतीय खेळाडूंनी जोरदार प्रदर्शन केलं आहे. यात विशेष कामगिरी केली आहे चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड यानं. ऋतुराज सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी आता त्याला केवळ 23 धावांची गरज आहे. अंतिम सामन्यात तो या यशाला नक्कीच गवसणी घालेल, अशी अपेक्षा आहे.ऋतुराज गायकवाडनं राजस्थान विरुद्ध शतक झळकावलं आहे तर यंदाच्या सिझनमध्ये त्यानं चार अर्धशतकं झळकावली आहेत.
IPL 2021 : ऑरेंज, पर्पल कॅप कुणाकडे? सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाजीच्या यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा
आयपीएलमध्ये सर्वाधिक 626 धावा पंजाबचा कर्णधार केएल राहुलने केल्या आहेत, सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. तर 603 धावा बनवून ऋतुराज दुसऱ्या नंबरवर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 587 धावा करत दिल्लीचा शिखर धवन तिसऱ्या स्थानी आहे. ऋतुराज सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही 22 षटकार लगावत दुसऱ्या स्थानी आहे. केएल राहुलनं सर्वाधिक 30 षटकार लगावले आहेत. तर सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या यादीतही तो 61 चौकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. शिखर धवनने आतापर्यंत या सिझनमध्ये सर्वाधिक 63 चौकार लगावले आहेत.
Qualifier 1: दिल्लीला पराभूत करुन चेन्नईची फायनलमध्ये धडक! CSK विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरीत!
आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे. हर्षलनं 14 सामन्यात 32 विकेट घेतल्या आहेत तर आवेश खान 24 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे तर बुमराह तिसऱ्या स्थानी असून त्यानं 21 विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद शामीनंही 19 विकेट्स घेतल्या आहेत. तर वरुन चक्रवर्ती, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि शार्दूल ठाकूरनं 18-18 विकेट्स घेतल्या आहेत.
केएल राहुल सिक्सर किंग
षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने या संपूर्ण हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्यासह 30 षटकार ठोकत यादीत पहिले स्थान मिळवले आहे. राहुल नंतर मॅक्सवेल 21 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने हंगामात आतापर्यंत 20 षटकार ठोकले आहेत. प्लेसिसनं देखील 20 षटकार ठोकले आहेत.