Money Heist Season 5 volume 2: मनी हाईस्ट नेटफ्लिक्सवरची सर्वाधिक लोकप्रिय सीरीजमधील एक आहे. मनी हाईस्टच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्सने बुधवारी मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच प्रचंड व्हायरल झालेला दिसून येत आहे. मनी हाईस्ट सीजन 5 चा दुसरा भाग 3 डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सीरीजमध्ये प्रोफेसर आणि त्यांची टीम चोरी करताना दिसून येणार आहे. त्यानंतर प्रोफेसरची टीम बॅंक ऑफ स्पेनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे. या सीरीजचे चारही सीजन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. 


टीजरच्या सुरुवातीलाच प्रोफेसर बोलत आहेत,"मागील काही तासांत मी माझ्या जवळच्या लोकांना गमावले आहे. त्यामुळेच मी या चोरीसाठी आणखी कोणाला मरू देणार नाही". हा टीजर 44 सेंकदाचा आहे. या सीरीजमधील 5 व्या सीजनच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक वाट बघत आहेत. हा या सीरीजचा शेवटचा भाग असणार आहे. प्रेक्षकांना या वेब सीरीजची प्रचंड उत्सुकता आहे. 


नेटफ्लिक्सने पाचव्या सीजनचा पहिला भाग प्रदर्शित होतानाच जाहीर केले होते की, मनी हाईस्टचा शेवटच्या सीजन दोन भागांत प्रदर्शित करण्यात येणार आहे. पाचव्या सीजनचा पहिला भाग प्रदर्शित झालेला आहे.


या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे
येत्या आठवड्यात तापसी पन्नूचा 'रश्मि रॉकेट' झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर 'सरदार उधम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.  'रश्मि रॉकेट' येत्या 15 ऑक्टोबरला तर 16 ऑक्टोबरला 'सरदार उधम' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


'लिटल थिंग्स' सीजन 4
'लिटल थिंग्स'मध्ये मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल मुख्य भूमिकेत दिसून आले होते. काव्या आणि ध्रुवच्या आयुष्यातील चढ-उतार. रोज होणारा त्रास, एकमेकांत उडणारे खटके चाहत्यांना चांगलेच भावतात. कारण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातदेखील या सगळ्या गोष्टी फेस करत असतात. त्यामुळे या सीरीजचा चाहता हा तरुणवर्ग आहे. पण 'लिटिल थिंग्स'चा हा शेवटचा सीजन असणार आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. 


जाणून घ्या "हे"  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे.