मुंबई : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची 23 वर्षीय मुलगी, सारा तेंडुलकर ही मागील बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. स्टाईल स्टेटमेंट असो किंवा आणखी कोणतं कारण, साराचा उल्लेख झाला की चर्चांना चांगलंच उधाण येतं. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी साराची फॅन फॉलोइंग कमालीची आहे. तिच्या पोस्टवर कायमच हजारो, लाखोच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट्स असतात. पण, आता अशाच एका पोस्टमुळं साराला ट्रोल करण्यात आलं.


सारानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिनं हातात कॉफीचा कप घेतल्याचं दिसत आहे. “@Bluetokaicoffee saves lives”, असं कॅप्शन तिनं दिलं. पण, तिची ही पोस्ट एका जुजरला खटकली. ज्यावर मग कमेंट करत, साराला या युजरनं थेट मेसेजच केला. साराला निशाण्यावर घेत तिनं ही आपल्या वडिलांचे पैसे वाया घालवतेय असं म्हटलं. ज्यावर सारानंही गप्प न राहता या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं. 


In Pics | Katrina Kaif च्या विवाहसोहळ्यात Amitabh Bachchan यांनी धरला ठेका 


सदर युदरचा उल्लेख करत, सारानं त्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिलं, कॅफिनवर खर्च झालेले पैसे म्हणजे त्यांचा चांगला वापर.... साराला ट्रोल करणाऱ्या या युजरकडून यापूर्वी सचिनच्या मुलाची म्हणजेच अर्जुन तेंडुलकर याचीही खिल्ली उडवण्यात आली होती. 






20 लाख रुपयांच्या किंमतीला आयपीएलच्या लिलावात बोली लागल्याबद्दल या युजरने अर्जुनची खिल्ली उडवली होती. अर्जुन यंदाच्या वर्षी आयपीएलच्या हंगामात मुंबईच्या संघातून पदार्पण करत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत तरी त्याला खेळपट्टीवर उतरवण्यात आलेलं नाही, त्यामुळं येत्या काळात त्याला प्लेइंग इवलेव्हनमध्ये स्थान मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.