In Pics | Katrina Kaif च्या विवाहसोहळ्यात Amitabh Bachchan यांनी धरला ठेका

ab1

1/6
बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिनेत्री कतरिना कैफ आणि निमित्त एका लग्नसोहळ्याचं. चर्चा तर होणारच ना! सध्या अशीच चर्चा सुरु आहे, की कतरिना कैफ हिच्या विवाहसोहळ्यात बिग बींनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.
2/6
तसं झालंही, पण एका जाहिरातीच्या निमित्तानं. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बिग बी, जया बच्चन आणि कतरिना कैफ यांचा दाक्षिणात्य अंदाज दिसून येत आहे.
3/6
सेलिब्रिटींची वेशभूषा या व्हिडीओच्या जमेची बाजू ठरत आहे.
4/6
कतरिना या व्हिडीओमध्ये बिग बींच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे.
5/6
एक वडील आपल्या मुलीच्या लग्नात पाहुण्या मंडळींची कशा प्रकारे स्वागत करतात, याचीच झलक या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
6/6
यापूर्वीही ही कलाकारमंडळी एका जाहिरातीच्याच निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
Sponsored Links by Taboola