मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू कृणाल पांड्या याला संचालनालय महसूल बुद्धिमत्ताने (DRI) मुंबई विमानतळावर रोखलं आहे. आयपीएल खेळल्यानंतर दुबईहून परतलेल्या कृणालकडे संशायास्पद सोनं, मौल्यवान वस्तू मिळाल्या असल्याची माहिती डीआरआयने दिली आहे.




कृणाल पांड्याकडे मिळालेल्या वस्तूंमध्ये सोन्याच्या दोन बांगड्या, महागडी घड्याळे आहेत. या वस्तूंचं कोणतंही डिक्लेरेशन कृणालकडे नसल्याने त्याला चौकशीसाठी थांबवण्यात आलं आहे. पुढील चौकशी सुरु आहे.


कोरोना महामारीमुळे यावेळी आयपीएल स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम सामना जिंकत पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे. कृणाल पांड्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. आयपीएल जिंकून मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी दुबईहून भारतात परतला. यावेळी कृणाल पांड्यादेखील सोबत होता. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना कृणाल पांड्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याचा संशय असल्याने चौकशी केली जात आहे.