Zaheer Khan On Hardik Pandya vs Shivam Dube : हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांनाही टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान मिळू शकते, असे वक्तव्य भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या टी 20 विश्वचषकातील खेळण्याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. काहींच्या मते दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. तर काहींच्या मते हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावरला तर शिवम दुबेला संधी मिळणं कठीण आहे. या चर्चेमध्येच झहीर खान याने मोठं वक्तव्य केले आहे. 


हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा भाग नाही. वनडे विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. त्यादरम्यान शिवम दुबे याला टीम इंडियात संधी मिळाली. दुबेनं या संधीचं सोनं केले. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरोधात दुबेनं प्रभावी कामगिरी केली. अफगाणिस्तानविरोधात गोलंदाजी आणि फलंदाजीत सातत्य दाखवलं. दुबे याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि दुबे यांच्याबद्दल चर्चा सुरु झाल्या. त्यावर झहीर खान याने मत वक्त केले. 


दोघांना संधी मिळू दिली जाऊ शकते - झहीर


झहीर खान म्हणाला की, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांना भारतीय टी 20 विश्वचषकात संधी मिळू शकते. जर पाच गोलंदाजासह खेळण्याचा विचार करात असाल तर तुम्हाला सहावा गोलंदाज लागेलच. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांनाही टी 20 विश्वचषकाचे तिकिट मिळू शकतं.


झहीर खान काय काय म्हणाला ?


झहीर खान म्हणला की, जर तुम्हाला सहाव्या गोलंदाजीचा पर्याय हवा असेल. अथवा बॅकअपसह खेळायचे असेल तर दोघांनाही संघाचा भाग बनवता येईल. मात्र त्यासाठी तुम्हाला दोन विकेटकिपरच्या ऐवजी एका विकेटकिपरसह जावं लागेल.  


नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेत शिवम दुबे याने अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले. त्याने उत्कृष्ट फलंदाजीसोबत गोलंदाजीही केली. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि शिवब दुबे यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार? की दोघांनाही विश्वचषकाचं तिकिट मिळणार, याची चर्चा सुरु झाली.  पाच महिन्यानंतर टी 20 विश्वचषक होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 विश्वचषकात भारताच्या चमूमध्ये कुणाला संधी मिळणार? याची चर्चा सुरु झाली आहे. 


आणखी वाचा :