List of players with most fifties in Test cricket : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन कसोटी सामन्यांची क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूटने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 


जो रूटने या सामन्यात एक अर्धशतक झळकावून एका दगडात दोन पक्षी मारले. म्हणजे त्याने दोन दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले आहेत. आता त्याची नजर टीम इंडियाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर आहे, ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते, जो तो लवकरच मोडू शकतो.


सर्वाधिक अर्धशतके करणारा जगातील तिसरा फलंदाज


जो रूटने मँचेस्टरमध्ये श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. आता जो रूटच्या पुढे फक्त भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल आहे. सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 68 अर्धशतके झळकावली आहेत, तर चंद्रपॉलने कसोटी क्रिकेटमध्ये 66 अर्धशतके केली आहेत. या यादीत जो रूट 64 अर्धशतकांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.


सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून फक्त 4 अर्धशतक दूर


जो रूट फक्त 33 वर्षांचा आहे. म्हणजे तो पुढील काही वर्षे इंग्लंडकडून सामने खेळताना दिसणार आहे. आणि आतापर्यंत जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 64 अर्धशतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त 4 अर्धशतक दूर आहे. त्यामुळे जो रूट हा विक्रम मोडू शकतो, असे बोल्या जात आहे.






जो रुटने राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डर टाकले मागे


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत जो रुटने भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविड, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डर आणि रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 63-63 अर्धशतके केली आहेत, तर रिकी पाँटिंगच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 62 अर्धशतके आहेत.


हे ही वाचा :


Virat Kohli On Shikhar Dhawan Retirement  : "भारताचा सर्वात विश्वासार्ह..." धवनच्या निवृत्तीवर कोहलीची जबरदस्त प्रतिक्रिया; काही मिनिटांत व्हायरल


WTC Points Table 2023-25 : इंग्लंडच्या विजयानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ! टीम इंडियासह या संघाची डोकेदुखी वाढली