Champions Trophy 2025 Gautam Gambhir: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीवर (Champions Trophy 2025) आपलं नाव कोरलंय. दुबईच्या मैदानात झालेल्या थरारक फायनलमध्ये न्यूझीलंडला त्यांनी चार विकेट्स आणि एक ओव्हर राखून पराभूत केलं. तब्बल 12 वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केलाय. अंतिम सामन्यात विजयासाठीचं 252 धावांचं आव्हान भारताने 49 षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. 

रोहित शर्माच्या 76 आणि श्रेयस अय्यरच्या 48 धावांच्या खेळीने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. रोहितने 7 चौकार 3 षटकार तर श्रेयसने 2 चौकार 2 षटकार ठोकले. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन विकेट्स घेत किवी टीमला सात बाद 251 वर रोखलं. जडेजाने 10 षटकांमध्ये अवघ्या 30 धावा देत एक फलंदाज बाद केला. मिचेलने 101 चेंडूंत 63 तर, ब्रेसवेलने 40 चेंडूंमध्ये नाबाद 53 धावा करत किवींना अडीचशे पार नेलं. 

टीम इंडियाच्या विजयानंतर गौतम गंभीर काय म्हणाला?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतासाठी हा विजय ऐतिहासिक होता. भारताच्या विजयात मुख्य प्रशिक्षक गंभीरची भूमिकाही महत्त्वाची राहिली आहे. अंतिम सामना सुरु असताना गौतम गंभीर सुरुवातीपासून एकाठिकाणी बसून होता. याचरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील दिसले. या सामन्यात चुकीचा फटका मारत बाद झाल्यानंतर गौतम गंभीर संतापल्याचे देखील दिसून आले. मात्र भारताने सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. टीम इंडियाच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये 1.4 बिलियन भारतीयांना शुभेच्छा...जय हिंद...असं बोलत गौतम गंभीरने टीम इंडियाच्या विजयाचे फोटो शेअर केले आहेत. 

भारताच्या विजयात गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली-

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी गौतम गंभीरवर सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. भारताला कसोटीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर गौतम गंभीरवर अनेकवेळा टीका वाढली. पण टीम इंडियाच्या विजयाने आता टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गंभीरने पडद्यामागे राहून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गौतम गंभीरने गोलंदाजीमध्ये एक विशेष प्लॅन बनवला होता. 

अंतिम सामन्यात रोहित-अय्यरने तुफानी खेळी-

रोहित शर्माने अंतिम सामन्यात नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्माने 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर सुरुवातीपासून संयमी खेळी केली. श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या. केएल राहुल 34 धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने 49 षटकांत लक्ष्य गाठले.

संबंधित बातमी:

Champions Trophy 2025 Virat Kohli: मेरा भारत महान! एकीकडे जंगी सेलीब्रेशन, दुसरीकडे मायेचा हात; विराट कोहली तिच्याजवळ गेला अन्..., PHOTO