IND W vs AUS W 3rd T20: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर (India vs Australia Women Series) आहे. पाच टी20 सामने दोन्ही संघात खेळवले जात आहेत. आजही तिसरा टी20 सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला गेला. भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) पार पडलेला हा तिसरा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने 173 धावाचं आव्हान भारतासमोर ठेवलं. जे पार करताना भारताने झुंज देण्याचा प्रयत्न केला, शेफाली वर्माने अर्धशतक ठोकलं पण तिची झुंज अखेर व्यर्थ गेली आणि सामना भारत 20 षटकात 151 धावाच करु शकला आणि सामना भारताने 21 धावांनी गमावला.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी दमदार फलंदाजी करत भारतासमोर एक तगडं लक्ष्य ठेवलं. यावेळी एलिस पेरीने सर्वाधिक 75 धावांची तगडी खेळी केली. याशिवाय बेथ मूनीने 30 आणि ग्रेस हॅरिसने 41 तर केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी संख्याही गाठता आली नसली तरी या तिघींचं योगदान पुरेसं असल्यानं भारतासमोर एक आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ यशस्वी ठरला. भारताकडून दिप्ती शर्मा, देविका वैद्य, अंजली सरवाणी आणि रेणुका सिंह या चौघींनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.
शेफाली-हरमनप्रीतची भागिदारी अयशस्वी
भारताची सुरुवात खास झाली नाही. स्मृती मानधना 1 तर जेमिमा 16 धावा करुन बाद झाली. त्यानंतर शेफाली आणि हरमनप्रीत यांनी चांगली भागिदारी केली. पण दोघी विजयापर्यंत भारताला घेऊन जाऊ शकले नाहीत. शेफालीने 52 धावा तर हरमनप्रीतने 37 धावा केल्या. दोघी बाद झाल्यावर अखेर दीप्ती शर्माने 25 धावा करत सामना जिंकवण्याचे सर्वोत्परी प्रयत्न केले. पण ती बाद झाल्यावर भारताने सामना जवळपास गमावला होता. अखेर 20 षटकांत भारत 151 धावा करु शकला आणि सामना 21 धावांनी भारताने गमावला. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसरा सामनाा भारताने सुपर ओव्हरच्या मदतीनं जिंकत मालिकेत बरोबरी साधली. पण आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने 2-1 ची आघाडी मालिकेत घेतली आहे.
हे देखील वाचा-