Yashasvi Jaiswal Wicket Controversy Ind vs Aus 4th Test : मेलबर्न कसोटीत भारताचा 184 धावांनी मोठा पराभव झाला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात 84 धावा करून आऊट झालेल्या यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मैदानावरील पंचांनी यशस्वीला नाबाद घोषित केले होते, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. स्निकोमीटरने चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क दर्शविला नाही, परंतु तरीही तिसऱ्या पंचाने यशस्वी जैस्वालला बाद केले. तिसऱ्या अंपायरच्या या निर्णयामुळे यशस्वी खूप संतापलेला दिसला आणि ड्रेसिंग रूममध्ये परतण्यापूर्वी त्याने अंपायरशी वाद घातला.
यशस्वी जैस्वालची विकेट पडल्यानंतर हा वाद आणखी वाढला. यशस्वी जैस्वालला आऊट घोषित करणारे तिसरे पंच शराफुद्दौला हे बांगलादेशी आहेत. यशस्वीला आऊट दिल्यानंतर बीसीसीआयकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खरंतर, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्विट केले की, "यशस्वी जैस्वाल स्पष्टपणे आऊट नव्हता. तंत्रज्ञान काय सूचित करत आहे याकडे तिसऱ्या पंचांनी लक्ष द्यायला हवे होते. फील्ड अंपायरच्या निर्णयाला ओव्हर-रूलिंग करताना तिसऱ्या पंचाकडे ठोस कारणे असायला हवे होते."
स्निकोमीटरवर दिसली नाही कोणतीही हालचाल...
हा वाद झाला कारण रिव्ह्यूमध्ये जेव्हा चेंडू यशस्वीच्या बॅट आणि ग्लोव्हजजवळून गेला, तेव्हा स्निकोमीटरवर कोणतीही हालचाल दिसली नाही. यानंतरही तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचाचा निर्णय बदलून यशस्वीला आऊट दिला. हा निर्णय पाहताच मैदानावर उपस्थित भारतीय प्रेक्षकांनी एकच गोंधळ घातला आणि गदारोळ सुरू केला. भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला चीटर चीटर ओरडत होते. मेलबर्नमध्ये यशस्वीचे पुन्हा एकदा शतक हुकले त्याने 84 धावा केल्या. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात 82 धावा करून यशस्वी जैस्वाल आऊट झाला होता.
ऑस्ट्रेलियाने मालिकेत घेतली 2-1 अशी आघाडी
यशस्वीला आऊट दिल्यानंतर भारतीय चाहते संतापले होते आणि त्यांनी मैदानावर फसवणुकीचे फलक दाखवण्यास सुरुवात केली. याशिवाय त्यावर SHAME लिहिलेले फलकही दाखविण्यात आले. मैदानावरील पंचही हे पाहून आश्चर्यचकित झाले. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटी 184 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
हे ही वाचा -